कौटूंबीक वादातून जावयाने सहा जणांना भोसकले

पत्नी, मेहुणा, सासू ठार, तिघे गंभीर

युवावार्ता (प्रतिनिधी)
शिर्डी – सासूचा संसारात हस्तक्षेप, बायको माहेरी गेली व सततच्या कौटुंबिक वादातून जावयाने सासरवाडीच्या सहा जणांना चाकूने भोकसले. यात पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यु झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही खळबळजनक घटना शिर्डी परिसरातील सावळीविहीर येथे गुरुवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. यात वर्षा निकम, रोहित गायकवाड आणि हिराबाई गायकवाड हे मयत झाले असून योगिता गायकवाड, चांगदेव गायकवाड व सांगिता गायकवाड हे तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी संगमनेर खुर्द येथील आरोपी रोशन कैलास निकम आणि सुरेश विलास निकम या दोघांना पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेत अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, सावळीविहीर येथील वर्षा गायकवाड हिचा विवाह संगमनेर खुर्द येथील सुरेश निकम याच्याशी झाला होता. काही दिवस चांगले गेल्यानंतर थोड्याच दिवसात दोघांमध्ये किरकोळ कारणामुळे वाद होऊ लागले. घरात वाद झाला की वर्षा माहेरी निघुन जायची. त्यामुळे, निकम याच्या संसारात सासु, सासरे, मेहुणी, मेहुणा यांचा हस्तक्षेप वाढत चालला होता. त्यामुळे, कधी समजुन सांगायचे आणि पुन्हा पत्नी घेऊन जायची. हे असे अनेकदा झाले. काही दिवसांपूर्वी देखील असाच वाद झाला तेव्हा वर्षा ने संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार पती विरोधात तक्रार दाखल केली आणि सावळीविहीर येथे निघुन गेली होती. त्यानंतर सुरेश निकम याने फोन करुन बोलावणे केले होते. मात्र, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तिला तिचे माहेरचे लोक देखील पाठीशी घालत होते. त्यामुळे निकम याचा मनात पत्नीच्या कुटुंबाकडील व्यक्तीविषयी संताप वाढत गेला. दरम्यान बुधवार दि. 20 सप्टेंबर रोजी त्याने एक धारधार चाकु खरेदी करत सासुरवाडीचे सगळे कुटुंब संपवायचे असा निर्धार केला. आणि रोशन निकम यास सोबत घेऊन त्याने थेट सावळीविहिर गाठली. दरम्यान, रात्री जेवण करुन गायकवाड कुटुंब झोपले होते. इतक्या रात्री जावई येतील आणि असे काही करतील अशी शंका देखील त्यांच्या मनात नव्हती. मात्र 12 वाजण्याच्या सुमारास दार वाजले आणि ज्याने दार उघडले त्याच्यावरच थेट चाकुने हल्ला केला. त्यावेळी एकच आरडाओरड झाला. पत्नी वर्षा हिने पाहिले असता ती पुढे आली तर तिच्यावर देखील त्याने हल्ला केला. निकम याने एकापाठोपाठ एक असे सहा जणांवर वार केले. यात पत्नी वर्षा निकम, मेहुणा रोहित गायकवाड आणि आजेसासु हिराबाई गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर मेहुणी योगिता गायकवाड, सासरे चांगदेव गायकवाड व सासू सांगिता गायकवाड हे तिघे या हल्यात गंभीर जखमी झाले. या चालु हल्ल्यामुळे घरात रक्ताचे थारोळे साचले होते. सर्व सहाही जण जमीनिवर कोसळल्याचे पाहिले तेव्हाच आरोपींनी तेथून काढता पाय घेतला. हा सर्व प्रकार होत असताना आजुबाजुच्या लोकांनी धाव घेतली मात्र आरोपींची क्रुरता पाहून कोणी आत जाण्याची हिंमत कोणी केली नाही. आरोपी गेल्यानंतर जे लोक जखमी होते त्यांना तत्काळ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची परिस्थिती देखील चिंताजनक आहे.
या घटनेची माहिती समजताच पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी वेगवेगळे पथक तयार करुन आरोपीचा मागोवा घेणे सुरु केले.
गुरूवारी पहाटे पोलीस पथकाने संगमनेर येथे आरोपींच्या घरी जाऊन चौकशी केली मात्र ते घरी नव्हते. पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत मुख्य आरोपी संतोष निकम व रोशन निमक यांना नाशिक येथून ताब्यात घेतले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख