संगमनेरच्या स्पर्धकांचा स्पेनमध्ये डंका ; डॉ. विखे, राजपाल आणि नाईकवाडी यांनी पटकाविला “आयर्नमॅन” किताब

संगमनेर (प्रतिनिधी) – जागतिक स्तरावरील स्पेन येथे दि. १० जुलै रोजी झालेल्या “आयर्नमॅन” या स्पर्धेमध्ये संगमनेरचे डॉ. संजय विखे, उद्योजक करण राजपाल आणि अमर नाईकवाडी यांनी दर्जेदार कामगिरी केली आहे. एकाच दिवसात 3.8 कि.मी.पोहणे, 180.2 किमी सायकलिंग आणि 42.2 किमी धावणे हा विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला आहे. विटोरिया गेस्टेज या शहरात ‘आयर्नमॅन’ ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Dr. Sanjay Vikhe

स्पेनमधील वेळेनुसार सकाळी ८.४५ वाजता या तीनही स्पर्धकांनी पोहण्यास सुरुवात केली. डॉ. विखे यांनी या स्पर्धेमध्ये आघाडी राखली. अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना यावेळी त्यांना करावा लागला. पोहण्याची स्पर्धा संपल्यानंतर लागलीच सायकलिंगची सुरुवात या स्पर्धकांनी केली. साधारणतः ८ तासांच्या अथक परिश्रमाने त्यांनी सायकलिंग पूर्ण केली आणि धावण्यास सुरुवात केली. डॉ. संजय विखे यांनी हि स्पर्धा १३ तास ३७ मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्यांच्या वयोगटामध्ये त्यांचा २७८ वा क्रमांक आला. करण राजपाल यांनी ही स्पर्धा १३ तास ५८ मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्यांचा जगभरात त्यांच्या वयोगटामध्ये १०७ वा क्रमांक आला. अमर नाईकवाडी यांनी ही स्पर्धा १४ तास २५ मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्यांचा जगभरात त्यांच्या वयोगटात १५६ वा क्रमांक आला.

२२६ किलोमीटरची ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी सलग १३-१४ तास शारीरिक कष्ट या त्रयींनी घेतले. गेल्या ५ वर्षांपासून या स्पर्धेची तयारी सुरु होती. अगदी पहाटे उठून नाशिक – पुणे बायपास येथे सायकलिंगची तयारी या स्पर्धकांनी केली होती. अनेक तास जिममध्ये घालविल्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये कसा तग धरू शकतो यासाठी त्यांनी सर्व पुर्व तयारी त्यांनी केली होती. केवळ शारीरिक क्षमता नाही तर डाएटवर सुद्धा त्यांनी विशेष भर दिला.

या वर्षीच्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये जगभरातून 3000 खेळाडू सहभागी झाले होते. भारतातील 5 खेळाडूंमधून 3 खेळाडूंनी संगमनेरचे प्रतिनिधीत्व स्पेनमध्ये केल्याने संगमनेरकरांसाठी हा उत्सवाचा क्षण आहे. या स्पर्धेकांना आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. संजय मालपाणी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व यशस्वी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख