बेशिस्त व अवजड वाहनांमुळे संगमनेरकरांचा जीव धोक्यात

अतिक्रमण आणि बेशिस्त वहातूक , प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे अपघातांत वाढ

बेशिस्त वाहनचालकांवर व अल्पवयीन वाहन चालकांवर पोलीसांनी वेळोवेळी कारवाई केली, नगरपरिषदेने अतिक्रमण करणार्‍यांवर नियमित कारवाई केली तसेच नाशिक रोडवरील नवीन रस्त्यावरील फुटपाथवर झालेले अतिक्रमण काढले तरी रस्ते मोकळे होतील व वाहतूकिला शिस्त लागेल.

केंद्र सरकारच्या आदेशानंतर राज्यात वाहनांना ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (एआयएस) प्रमाणित परावर्तक (रिफ्लेक्टर) लावणे बंधनकारक आहे; मात्र त्यानंतरही अवजड, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी बसवर एआयएस प्रमाणित रिफ्लेक्टर लावण्यात आलेले दिसत नाहीत. निकृष्ट दर्जाच्या रिफ्लेक्टरचा वापर केला जात असून, पहाटे आणि रात्रीच्या धुक्यामध्ये वाहनांवरील रिफ्लेक्टर रिफ्लेक्ट होत नसल्याने देखील अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- शहराच्या बाहेरून जाणारे बायपास रोड करूनही अवजड वाहनांची वाहतूक शहरातूनच होत असल्याने व शहरातील रस्ते अजूनही अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने संगमनेरकर धोक्याचे जीवन जगत आहेत.
शहरातील अनेक रस्त्यांवर अवजड वाहनांची होणारी प्रचंड वाहतूक हा कायमच संगमनेरकरांसाठी चिंतेचा विषय आहे. पोलिस, नगरपालिका, आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रितपणे ही जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अपेक्षित असताना कोणीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. पुणे, नगर, नाशिककडे जाणारे अनेक ट्रक, कंटेनर व इतर अवजड वाहनांची वाहतूक शहरातील विविध रस्त्यांवरून होत असते. पुणे, नाशिक, नगर, अकोले अशा प्रमुख रस्त्यावरून शहरात कंटेनर्स, ट्रक, उसाचे ट्रक, बैलगाड्या व इतर वाहने येतात. या वाहनांचा वावर शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून होत असताना त्याचा धोका दुचाकीस्वारांना सर्वाधिक असतो. शनिवारी देखील शहरात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. यापूर्वीही अनेक अपघातात संगमनेरकरांना जीव गमवावा लागला आहे.
अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्याने अत्यंत अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम होत आहे. शहराबाहेर उपलब्ध असलेल्या बायपास रोडवरून अवजड वाहनांची वाहतूक वळविण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घेण्याची नागरीकांची मागणी आहे. प्रत्येक रस्त्याला पर्यायी रस्ता असून त्या रस्त्याने जर ही वाहतूक वळविली तर शहरातील रस्त्यांवरील ताणही कमी होऊ शकतो.
शहरातील रस्ते रूंद होत असले तरी अतिक्रमण आणि बेशिस्त वहातूक , प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे अपघाताची मालिका नियमित सुरू असते.यावर अंकूश ठेवण्यासाठी उपाय योजनांची तातडीने गरज आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख