युपीएससी परिक्षेत संगमनेरकरांचा झेंडा

चहावाल्याचा मुलागा मंगेश खिलारीचे यश डोळे दिपवणारे

मांची येथील स्वप्निल डोंगरे व पिंपरणे येथील राजश्री देशमुखची उत्तुंग भरारी

एकाचवेळी संगमनेरमधील तिघांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळविण्याची पहिलीच घटना

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर-

जिल्ह्यातील 9 जणांनी युपीएससी परिक्षा क्रॅक करत उत्तुंग यश मिळविले आहे. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील चहाची टपरी चालविणार्‍या पिराजी खिलारी यांचा मुलगा मंगेश यांनी युपीएससी उत्तीर्ण करीत देशभरात 396 वी रँक मिळविली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने (युपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील मंगेश खिलारी, मांची येथील स्वप्नील डोंगरे आणि पिंपरणे येथील राजश्री देशमुख यांनी खडतर परिश्रम घेत युपीएससी परिक्षेत यश संपादन केले. एकाचवेळी संगमनेरमधील तिघांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळविण्याची ही पहिलीच घटना आहे. तसेच अहमदनगरमधून सागर यशवंत खर्डे, डॉ. शुभांगी सुदर्शन केकाण-पोटे, श्रुती सुभाष कोकाटे, महारूद्र जगन्नाथ भोर यांनी देखील उत्तुंग येश मिळविले आहे.
मंगेश खिलारीने 396वा क्रमांक पटकावला आहे. अवघ्या 23व्या वर्षी मंगेशने हे घवघवीत यश मिळवलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात मंगेशचा जन्म झाला. त्याचे वडील चहाची टपरी चालवतात. आई विडी कामगार असून शेतातही काम करते. मंगेशचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले. त्यानंतर पुण्याच्या एसपी महाविद्यालयातून त्याने पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी घेतली. त्याच वेळी त्याने पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. लहानपणापासूनच मंगेश हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जात होता. त्यामुळे मोठ्या पदावर प्रतिष्ठेची नोकरी करण्याचं स्वप्नं बघायला त्याने सुरुवात केली. आयआयटी आणि यूपीएससी असे दोन पर्याय त्याच्याकडे होते. आर्थिक परिस्थितीमुळे मंगेशला आयआयटीपर्यंत पोहोचता आले नाही. पण यूपीएससी देण्याचा त्याचा निश्‍चय पक्का होता. मंगेशला आयएएस व्हायचं आहे. आयपीएससाठी निवड झाल्यास तो पुन्हा आयएएससाठी प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून समाजसेवा करण्याचं त्याचं स्वप्न आहे.


याचबरोबर संगमनेर तालुक्यातील मांची येथील स्वप्नील राजाराम डोंगरे यांने 707 रॅक मिळवत यश मिळविले आहे. स्वप्नील डोंगरे पगिली ते चौथीपर्यंत आदर्श विद्यालय नाशिक येथे तर पाचवी ते बारावी सराफ विद्यालय संगमनेर येथे शिक्षण घेतले आहे. पुणे विद्यार्थी गृह इंजिनिअरिंग कॉलेज येथून पुढील शिक्षण पूर्ण केले आहे. स्वप्नील डोंगरेचे वडील राजाराम दामोदर डोंगरे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नाशिक ग्रामिणला कार्यकारी अभियंता असून आई वैशाली राजाराम डोंगरे नाशिक महानगरपालिकेत जिल्हा परिषद शिक्षिका आहे.

तसेच प्रत्येक तरुणींनी आदर्शदायी ठरावा असा राजश्रीचा प्रवास थक्क करणारा आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील शांताराम देशमुख हे भारतीय सेनेत सेवा करून रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर शेती करून मुलांना अतिशय कष्टाने शिकवले. त्यांना तीन मुले असून राजश्री सर्वात मोठी, धाकटा मुलगा मयूर आणि मुलगी भावना तिघेही अत्यंत हुशार मुलं. मयूर आणि राजश्री दोघांनीही यूपीएससीची परीक्षा दिली होती त्यात राजश्रीने दुर्दम्य इच्छाशक्ती अन् कष्टाच्या बळावर गावातील पहिली यूपीएससी परीक्षा पास होण्याचा मान मिळवला. राजश्रीने दहावीपर्यंतची शिक्षण डेरे इंग्लिश मीडियम मध्ये घेतलं अकरावी, बारावी श्रमिक महाविद्यालय आणि त्यानंतर पुणे येथे सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्रदान केली. शिक्षण इथे न थांबता मनात जिद्द यूपीएससीची होती त्याप्रमाणे तो अभ्यास सुरू केला अन् यूपीएससीचा खडतर अभ्यास तीन वर्ष केला आणि यशस्वी झाली. जीवनात कठीण प्रसंगी त्यावर मात करण्याचे वडिलांनी शिकवले. जीवनातील संकटास कणखरपणे सामोरे जाणे गरजेचे असल्याचे राजश्रीने सांगितले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे ,कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, रणजीतसिंह देशमुख यांचेसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

यशस्वी विद्यार्थी :
1 जरड प्रतिक अनिल (पुणे)
2 ऋषिकेश हनमंत शिंदे (सांगली)
3 अर्पिता अशोक ठुबे (ठाणे)
4 सोहम सुनील मांढरे (पुणे)
5 मंगेश पिराजी खिलारी (अहमदनगर)
6 सागर यशवंत खर्डे (अहमदनगर)
7 आशिष अशोक पाटील (कोल्हापूर)
8 शशिकांत दत्तात्रय नरवाडे (धाराशिव)
9 स्वप्नील चंद्रकांत बागल (हिंगोली)
10 लोकेश मनोहर पाटील (जळगाव)
11 प्रतीक्षा संजय कदम (सातारा)
12 मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे)
13 करण नरेंद्र मोरे (सातारा)
14 शिवम सुनिल बुरघाटे (अमरावती)
15 शिवहार चक्रधर मोरे (नांदेड)
16 राजश्री शांताराम देशमुख (अहमदनगर)
17 महारुद्र जगन्नाथ भोर (अहमदनगर)


प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख