Sunday, June 4, 2023

संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई आयोजित रविवारी संपादक राज्य परिषदेचे संगमनेर येथे आयोजन

मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे हस्ते उद्घाटन

मुंबई प्रतिनिधी
युवावार्ता
– महाराष्ट्रातील जिल्हास्तरीय वृत्तपत्रांच्या प्रश्‍नांसाठी तसेच विचार समन्वयासाठी रविवार दिनांक 28/5/2023 रोजी संपादक राज्य परिषदेचे आयोजन संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई या संस्थेद्वारे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी दिली आहे. या परिषदेचे उद्घाटन मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, राजहंस दुधचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, संगमनेरच्या मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर, नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


सकाळच्या सत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर लघु संवर्ग वृत्तपत्रांची स्थिती आणि संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रात मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ संपादक केशवराव तुपे, अ‍ॅड. इलियास खान, डॉ. संतोष खेडेलेकर, योगेश पाटील, राजा कांदळकर हे सहभागी होणार आहेत. संस्थेच्या जिल्हास्तरावरील नियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार तसेच उपस्थित संपादक-पत्रकार यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.
2012 साली संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुुंबई या संस्थेची स्थापना झाली. शासकीय संदेश प्रसार नियमावली 2018, पत्रकार कल्याण निधी, शासकीय जाहिरात धोरण, आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना यासारख्या अनेक मुद्यांवर गेल्या 11 वर्षांपासून संस्था काम करीत आहे.
संगमनेर येथील बीएसटी सह्याद्री महाविद्यालयाच्या सभागृहात होणार्‍या राज्य परिषदेस प्रवेश निमंत्रित व नोंदणी केलेल्या संपादकांसाठीच मर्यादित आहे. संपादक राज्य परिषद यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र लचके, समन्वयक मनोज आगे, अरविंद गाडेकर, आनंद हासे, सुदीप हासे, संजय अहिरे, किशोर आव्हाड, रश्मी मारवाडी, मनिषा जोंधळे व सहकारी प्रयत्नशील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

इंटेलिजन्स : लाभदायक की हानीकारक

आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या क्षेत्रात नकारात्मक शक्यतांविषयी तज्ञ लोकांचे भाकित(लेखक...

संगमनेरात आक्रोश, तालुका बंदसह मोर्चाचे आयोजन

मंगळवारी एकवटणार हिंदू समाज, अत्याचार रोखण्याचे आवाहनविविध संघटनाच्या सहभागातून...

जनतानगरमध्ये महिलेसह चौघांना मारहाण

मारहाणीत कोयता फायटर व गजाचा वापरमारहाणीत ६ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल

संगमनेर मर्चंट्स बँक निवडणूकीत अखेरच्या क्षणी एकोप्याचे दर्शन

व्यापार्‍यांच्या कामधेनूत राजकारण टाळून बिनविरोधचा रचला इतिहासयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - बँकेचे संस्थापक स्व.ओंकारनाथजी मालपाणी...

स्वीफ्ट कार व दुचाकीची जोराची धडक

कारच्या धडकेत युवक ठारयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर- नाशिक-पुणे महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे दुचाकीस्वार गतीरोधकावरून जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने...