महाराष्ट्राचा धगधगता ज्वलंत इतिहास सादर
संगमनेर तालुका हा विकासातून सर्व क्षेत्रात राज्यात पुढे – आमदार थोरात
सुमारे 50 हजारांच्या उपस्थितीत आमदार थोरात यांची रॉयल एन्ट्री यावेळी प्रत्येकाची छाती अभिमानाने भरून आली. यावेळी उपस्थित अशी संवाद साधताना आमदार थोरात म्हणाले की डॉ अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांचा इतिहास जिवंत केला आहे. सर्व संगमनेर करांसाठी ही मोठी आनंद पर्वणी आहे. सहकार, शिक्षण, सर्व सुख सुविधा, पाणी ,सुसंस्कृत वातावरण, सर्वधर्मसमभाव, सर्वांना समान संधी यामुळे संगमनेर तालुका हा विकासातून राज्यात सर्वात पुढे आहे. याचबरोबर या दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले असून डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा आनंद निर्माण झाला आहे. संगमनेर तालुका हा एक परिवार असून भक्कम कार्यकर्त्यांची फळी नागरिकांची साथ यामुळे ही विकासाची घोडदौड आपण सर्व मिळून अशीच पुढे नेऊ या असे आवाहनही त्यांनी केल. यावेळी उपस्थित आणि प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
संगमनेर ( प्रतिनिधी ) विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला पन्नास हजार नागरिकांच्या अलोट गर्दीने खा. डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले व महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास सांगणारे धगधगते शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहताना रोमांच अनुभवला असून उपस्थित प्रत्येकाच्या जीवनातील हा अभूतपूर्व व अविस्मरणीय प्रसंग ठरला.
जाणता राजा मैदान येथे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद सोहळ्यात आयोजित शिवपुत्र संभाजी या महानाट्याला सुरुवात झाली यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात खासदार डॉ.अमोल कोल्हे, उद्योगपती राजेश मालपाणी, मा आमदार डॉ. सुधीर तांबे,सौ.कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव पा खेमनर, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, रामहरी कातोरे, इंद्रजीत भाऊ थोरात, मिलिंद कानवडे, आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री व सौ राजेश मालपाणी, शंकर पा खेमनर, व के के. थोरात यांच्या हस्ते दीपप्रज्वल करण्यात आले. तर श्री व सौ मिलिंद आवटी व श्री व सौ विश्वासराव मुर्तडक, सौ मीराताई पांडुरंग शेटे, श्री व सौ सीताराम राऊत यांच्या हस्ते रंगमंच पूजन झाले. सौ शोभाताई व दिलीपराव पुंड, श्री व सौ सोनाली शिंदे, श्री व सौ संगीता उत्तम कुदणर, श्री व सौ नवनाथ आरगडे यांच्या हस्ते अश्व पूजन करण्यात आले. तर श्री व सौ आरिफ देशमुख, श्री व सौ अफजल शेख, श्री व सौ किरण मिंडे ,श्री व सौ सुनंदाताई जोर्वेकर यांच्या हस्ते शस्त्र पूजन झाले.तर श्री व सौ विजयकुमार फिरोदिया व श्री व सौ बाळासाहेब ढोले यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
अत्यंत आकर्षक सजावट, उत्कृष्ट बैठक व्यवस्था, भव्य पार्किंग आणि सुमारे 50 हजार नागरिकांच्या उपस्थित सुरू झालेल्या या महानाट्याला शाहिरी डफाने व आतिषबाजीने सुरुवात झाली.
शंभू राजांचा जन्मोत्सव, आग्र्यामधून बाल शंभूराजांची सुटका, दिलेरखानाला दिलेले आव्हान हे सर्व प्रसंग अंगावर शहारे आणत होते.. सुमारे अडीचशे कलावंतांच्या उपस्थितीत भव्यदिव्य स्टेज जणू रायगडाची जाणीव करून देत होते. अशातच सह्याद्रीच्या छावा. शिवपुत्र संभाजी महाराजांची रुबाबदार घोड्यावरून प्रेक्षकांमधून दिमागदार एन्ट्री झाली. डॉ अमोल कोल्हे यांचे आगमन होतात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.
महानाट्यातील वाक्य न वाक्य अंगावर शहरे आणत होतं. मराठ्यांच्या तेजस्वी आणि धगधगत्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या महानाट्याने अनेकदा सर्वांच्या डोळ्यात अश्रू आनले. अभिनेते महेश कोकाटे यांनी साकारलेल्या अनाजी पंतांनी प्रचंड चिड आणली. तर अभिनेत्री स्नेहलता वसईकरणे साकारलेल्या येसूबाईची भूमिका संस्मरणीय ठरली.
समुद्रावरील जंजिरा मोहीम, बुरानपुर हल्ला, आल्यानंतर मोगली फौजांचे महाराष्ट्रावर आक्रमण कडवट औरंगजेब बादशहा, त्यांचे संवाद हे सर्व अद्भुत होते. संभाजी राजांना झालेली फितूर आणि अटक आणि मराठी मातीसाठी झालेले त्यांचे हाल आणि त्यांचा मृत्यू यामुळे प्रत्येक जण गहिवरून आला आणि याचबरोबर प्रत्येकाची छातीही शिवपुत्र संभाजी यांच्या बद्दल अभिमानाने भरून आली. संगमनेरच्या दोनशे कलाकारांचा सहभाग हाही उल्लेखनीय ठरला.