वाळू माफियाची पुन्हा वाढली मुजोरी

थेट तहसीलदारांना घरी जाऊन शिवीगाळ व धमकी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राज्य सरकारच्यावतीने महसूल विभागाने नविन वाळू धोरण आणले आहे. या धोरणानूसर ग्राहकांना स्वस्तात घरपोहच वाळू मिळून वाळू तस्करी थांबणार होती. त्याचबरोबर वाळू तस्करांची मुजोरी व दहशतही थांबणार होती. मात्र यातील काहीही झाले नसल्याने हे नवीन वाळू धोरण फुसकाबार ठरत आहे. संगमनेरमध्ये तर बेसुमार अवैध वाळू तस्करी सुरूच असून या तस्करांची मुजोरी आता थेट तहसीलदारांना धमकी व शिवीगाळ देण्यापर्यंत वाढली आहे. अशीच मुजोरी काल सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सदर वाळू तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने महसूल विभागात भिती आणि खळबळ उडाली आहे.
संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूचा उपसा सुरू आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू उपसा बाबत कठोर भूमिका घेऊनही संगमनेर तालुक्यात मात्र खुलेआम उपसा केला जात आहे. यामुळे वाळू तस्कर मुजोरी कुठेही कमी झाली नाही. या वाळू तस्करांना रोखण्यासाठी जो आडवा येईल त्याला सरळ करण्यासाठी हे वाळू तस्कर कोणत्याही स्थराला जात असतात. अवजड व भरधाव वाहनांमुळे रस्त्यांची दुरावस्था व भितीचे वातावरण यामुळे अनेक ग्रामस्थ या तस्करांना विरोध करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांनाही हे वाळूतस्कर अनेकदा धमकावत असतात. आता त्यांची मजल तर थेट महसूल अधिकार्‍यांना धमकावण्यापर्यंत पोहोचली आहे.


शहरातील मालदाड रोड परिसरात राहणारा वाळू तस्कर शुभम थोरात हा सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मालपाणी नगर परिसरातील घरी गेला. त्याने तहसीलदारांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून त्यांच्या घराची बेल वाजवली. त्याने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदारांनी दरवाजा न उघडल्याने या वाळू तस्कराने दरवाजावर थापा मारून त्यांना व कुटूंबाला शिवीगाळ केली.
यानंतर तहसीलदारांनी आपल्या घराचा दरवाजा उघडला. माझा कॉल का घेतला नाही असे म्हणून या वाळू तस्कराने तहसीलदारांना शिवीगाळ केली. याबाबत तहसीलदार धीरज बाळासाहेब मांजरे त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम थोरात याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक जाधव करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख