सहकारमहर्षी टी-20 क्रिकेट स्पर्धेचा राज्यात लौकिक – आ. थोरात

आकर्षक सजावट, ऑनलाइन प्रक्षेपण, या सुसज्ज तयारीमुळे ठरत आहे आकर्षक

हिरवळीसह उत्कृष्ट नियोजनाने सजले क्रीडा संकुल
संगमनेरची टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा ही उत्कृष्ट आयोजनाने लौकिकास्पद ठरली आहे. यामध्ये संपूर्ण मैदानावर हिरवळ, व्हीआयपी बैठक व्यवस्था, 10000 नागरिकांसाठी प्रेक्षक गॅलरी, संगीत वाद्य, आकर्षक सजावट, ऑनलाइन प्रक्षेपण, या सुसज्ज तयारीमुळे ही स्पर्धा आकर्षक ठरत आहे. अजिंक्य रहाणे सह विविध राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू यावेळी सहभागी होणार आहेत.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – क्रीडा क्षेत्रामध्ये ही युवकांना करिअरच्या अनेक संधी आहेत. अनेक राज्य पातळीवरील खेळाडूंचा सहभाग, क्रीडा प्रेमींची मोठी उपस्थिती, दर्जेदार आयोजन आणि उत्कृष्ट मैदान हे वैशिष्ट्य असलेली संगमनेरची सहकार महर्षी टी -20 क्रिकेट स्पर्धा ही राज्यात लौकिकास्पद ठरली असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले. या स्पर्धेचा धुमधडाक्यात शुभारंभ झाला.


सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने आयोजित सहकार महर्षी टी -20 क्रिकेट स्पर्धेच्या 24 व्या वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आ डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, गिरीश मालपाणी, कैलास सोमानी, रामहरी कातोरे, गगन थोरात, राजेंद्र काजळे, सरोदे बँकेचे मॅनेजर वनम, सुधाकर जोशी, सोमेश्वर दिवटे, मिलिंद कानवडे, डॉ मैथिलीताई तांबे, निखिल पापडेजा, मनीष माळवे, अंबादास आडेप, गौरव डोंगरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले की, खेळातून सांघिक भावना वाढीस लागते. याचबरोबर यश अपयश पचवण्याची क्षमता निर्माण होते मैदानी खेळ हे आरोग्याची गुरुकिल्ली असून प्रत्येक युवकाने एक छंद जोपासण्या बरोबर एक मैदानी खेळ खेळलाच पाहिजे. खेळामधूनही करिअरच्या अनेक संधी असून संगमनेरचा अजिंक्य रहाणे आज देश पातळीवर नेतृत्व करत आहे. आ. सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगले मैदान करून ही स्पर्धा राष्ट्रीय ठरावी असे आयोजन या ठिकाणी होत असल्याने राज्याबाहेरचेही अनेक खेळाडू संगमनेर मध्ये खेळण्यासाठी येतात हे आनंदाची बाब आहे.
माजी आ. डॉ. तांबे म्हणाले की, नामवंत खेळाडूंचा सहभाग आणि अटीतटीच्या लढती यामुळे सतरा दिवस संगमनेर मधील क्रिकेट प्रेमींना मोठी मेजवानी मिळणार आहे. आ. सत्यजित तांबे म्हणाले की, 2024 हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्ताने संगमनेर तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख