फर्नांडिस कुटुंबियांना भुजबळांकडून मिळाले 8 कोटी

0
1536

सांताक्रूझ मधील घर बळकविल्याचा होता आरोप

अंजली दमानिया यांनी दिला लढा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मध्यस्थी

मुंबई (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेले काही वर्ष फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला होता. काही दिवसांपूर्वीच मी पुन्हा एकदा हा आवाज उठवणार आणि फर्नांडिस कुटुंबियांना न्याय मिळवून देणार असे अंजली दमानिया यांनी सांगितले होते.

भुजबळ कुटुंबाने त्यांचे देणे तब्बल २० वर्षाने दिले. त्या कुटुंबाला आता त्यांचे 8 कोटी रुपये मिळाले आहेत.

७८ वर्षाच्या त्या आईला आता तिच्या ३ ऑटिस्टिक मुलांच्या भविष्याची काळजी करावी लागणार नाही.
पवार कुटुंबाबरोबर माझी टोकाची भूमिका असतांना देखील ह्या लढ्यात राजकारण बाजूला ठेऊन सुप्रिया सुळे यांनी खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
श्री एकनाथ शिंदे आणि श्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री भुजबळांना समज देऊन पैसे देण्यास भाग पाडले त्याबद्दल दोघांचेही मनापासून आभार असे अंजली दमानिया यावेळी म्हणाल्या.

भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक लढे दिले. पण या लढ्यातून खूप समाधान मिळाले.
मी गेले १० दिवस देशाबाहेर होते म्हणून ही बातमी कळवण्यास विलंब झाला असेही त्या म्हटल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here