सकल हिंदू समाज आपल्यावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात एकवटणार
मंगळवारी सकाळी 9 वाजता शास्त्रीचौक नगरपालिकेसमोर मोर्चाला सुरुवात
पोलीस प्रशासनाच्या वतीने अनेक नियम अटींचे व सुविधांचे नियम
युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर- सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी संगमनेर शहरात निघणार्या भगव्या मोर्च्याच्या पार्श्वभुमीवर हिंदूत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजाच्यावतीने भव्.य भगव्या मोर्चाची तयारी पुर्ण झाली आहे. प्रशासनाच्या वतीनेही अखेरच्याक्षणी या मोर्चाला परवानगी देऊन चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आपली तयारी पुर्ण केली आहे. त्यामुळे मंगळवारी संगमनेरात भगवे वादळ येणार असून सकल हिंदू समाज आपल्यावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात एकवटणार आहे.
जोर्वे येथील निरपराध युवकांना जोर्वेनाका परिसर येथे काही समाजकंटकांनी जबर मारहाण करून त्यांच्यावर खुनी हल्ला केला होता. त्याचे तीव्र पडसाद ग्रामीण व शहरी भागात उमटले आहे. या संतापजनक घटनेमुळे अनेक ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन सदरील घटनेचा निषेध करून त्या अनुषंगाने ठराव पारित केले आहेत. गेल्या काही दिवसांतील संगमनेर शहर व तालुक्यात बेसुमार होणारी गोवंश कत्तल, लव्ह जिहाद सारख्या घटना, किरकोळ वादातून ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, शालेय विद्यार्थी व युवक यांना होणारी मारहाण यामुळे शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचा आरोप हिंदूत्ववादी संघटनांनी केला आहे. या सर्व संतापजनक घटनाक्रमांमुळे हिंदू धर्मियांच्या भावना तीव्र झाल्या आहे. हिंदू हा धर्म शांतताप्रिय व सहिष्णुतावादी असल्याने या घटनेचा कायदेशीर मार्गाने न्याय मागण्यासाठी संगमनेरात भव्य भगव्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी 9 वाजता हा मोर्चा शास्त्रीचौक नगरपालिकेसमोर येथून सुरू होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा बाजारपेठ रोड मार्गे तेलीखुंट, सय्यदबाबा चौक, मनेरोड, चावडी, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बसस्थानक व त्यानंतर प्रांत कार्यालय या ठिकाणी या मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चासाठी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारोच्या संख्येने नागरीक सहभागी होणार आहे. या भगव्या मोर्चात दहा ते पंधरा हजार नागरीक सहभागी होणार असल्याचा अंदाज आयोजक व पोलीसांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने मोर्चाला परवनगी देतांना अनेक नियम अटींचे व सुविधांचे नियम घालून दिले आहे. त्यानुसार मोर्चेकरांच्यावतीने ठिकठिकाणी पाणी पुरवठ्याची सोय, वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यात पारर्कींगसाठी रंगारगल्लीतील रंणजीत मैदान, अकोला नाका येथील शारदा शाळा, इंदिरानगर येथील मैदान, जुने तांबे हॉस्पिटल शेजारील रिकामी जागा, सौभाग्य मंगल कार्यालयाशेजारील मैदान, जाणताराजा मैदान अशा अनेक ठिकाणी वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
जोर्वे नाका परिसरात घडलेल्या घटनेनंतर संगमनेर शहरातील अनेक व्यापारी बंधूंनी, कामगार, टपरीधारक व सामान्य संगमनेरकर या घटनेचा निषेध म्हणून स्वयंस्फूर्तीने दुकान व व्यवहार मोर्चाच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा कोणत्याही राजकीय हेतून प्रेरीत नसून अथवा कोणत्याही संघटनेने आयोजीत केलेला नसून सकल हिंदू धर्मियांच्यावतीने हा मोर्चा होत आहे. व्यासपीठावर कुणीही राजकीय व्यक्ती नसणार आहे. हा मोर्चा सुरळीत पार पडावा, यासाठी आयोजकांनी योग्य ती उपाय योजना केली असल्याचे – मयूर शेलार, विशाल वाकचौरे, योगेश सूर्यवंशी, कुलदीप ठाकूर, विजय पठाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
मंगळवारी आयोजित भव्य मोर्चासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे म्हणाले, आयोजकांनी मोर्चा व बंद संदर्भात निवेदन दिलेले आहे. मात्र यात बंद मागे घेण्यात आला असून केवळ मोर्चासाठी परवानगी मागितली आहे. मोर्चाला परवानगी देतांना त्यासाठी कठोर नियम-अटींचे पालन मोर्चेकरांना करावे लागणार आहे. मोर्चात येणार्या नागरिकांची सुविधा, त्यांना पाणी-वाहतूक, पार्किंग याची सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. तसेच मोर्चाप्रसंगी कोणत्याही व्यापार्यावर दुकाने बंद करण्याची सक्ती आयोजकांना करता येणार नाही. मोर्चात कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक भाषण अथवा गुन्हेगारी प्रवृत्ती असणार्या इसमाला भाषण करण्यास मज्जाव घालण्यात येणार आहे. मोर्चाप्रसंगी वापरण्यात येणारे झेंडे याची काळजी मोर्चेकरांना घ्यावी लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मोर्चा संपल्यानंतर जे आंदोलक मागे राहणार आहे त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. अनेक वेळा मागे राहणारे काहीजण विचित्र घटनेला कारणीभूत ठरतात. त्यामळे अशा आंदोलकांवर पोलिस खास लक्ष ठेवणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर स्थानिक पोलीसांसह राखीव पोलीस दल, शिघ्रकृतीदल तैनात करण्यात येणार आहे. मोर्चा शांतातेत पार पाडावा असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले.
सकल हिंदुसमाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या सुमारे 62 ग्रामपंचायतीने ठराव करून या माेर्चात सहभागी हाेण्याचे ठरवीले आहे. त्याचबराेबर अकाेले तालुक्यातील नागरीकांनी अकाेले बंद ठेऊन या माेर्चात सहभागी हाेण्याचे ठरवीले आहे. पाेलीस व प्रशासनाने घालुन दिलेल्या नियम अटींचे पालक करत हा माेचार् यशश्वी करण्याचा प्रयत्न आयाेजक करणार आहे. या माेर्चात 25 हजार पेक्षा जास्त नागरीक सहभागी हाेणार असून त्यांच्या साठी पाणी, अॅम्बुलन्स , पार्कीग, डाॅक्टर अशा सर्व साेयी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता या माेर्चाची प्रांत कार्यालयासमाेर सांगता हाेणार असून या ठीकाणी सुदशर्न न्यूजचे प्रमुख सुरेश चव्हाणके, विश्वहिंदु परिषदचे संघटनमंत्री शंकरराव गायकर हे या माेर्चाला मार्गदर्शन करणार आहे.
सदर माेर्चात काेणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी 200 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष व राजकारण विरहीत माेठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयाेजकांनी केले आहे.