आ.थोरात यांच्या हस्ते  अमृतवाहिनी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

विशेष फोटो व माहितीसह अत्यंत दर्जेदार दिग्दर्शिका

संगमनेर (प्रतिनिधी)

शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून ओळखल्या जाणारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेने जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार केलेल्या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन विधिमंडळ पक्षनेते तथा मा. महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

    सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अतिथी गृह येथे आ. थोरात या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. ,  बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी व्हा. चेअरमन नानासाहेब शिंदे, ॲड. लक्ष्मण खेमनर, किसनराव वाळके,संतोष हासे , कचरू फड, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी , ॲड त्रिंबक गडाख आदि उपस्थित होते.
           यावेळी आमदार थोरात म्हणाले कि,  अमृतवाहिनी सहकारी बँकेने कायम सभासद शेतकरी व तालुक्यातील नागरिकांना मोठी आर्थिक मदत केली आहे. बँकेने अत्याधुनिक व संगणकीय प्रणाली वापरताना उत्कृष्ट कामकाज केले आहे यामुळे बँकेचा राज्य पातळीवर गौरव झाला आहे. हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे त्याचबरोबर अमृतवाहिनी बँक ही दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करत असते यावर्षी विशेष फोटो व माहितीसह अत्यंत दर्जेदार दिग्दर्शिका  झाली आहे.

तर सुधाकर जोशी म्हणाले की काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम अमृतवाहीणी बँकेच्या माध्यमातून होत यावर्षीची दिनदर्शिका विशेष असून नागरिकांना यामधून अद्यावत माहिती मिळणार आहे.

यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व अमृतवाहिनी बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख