सफायर बिझनेस एक्स्पोला अभूतपूर्व प्रतिसाद

१६ वर्षांच्या इतिहासात २०२४ ला गर्दीचा उच्चांक

बुधवार दि. १७ जानेवारीला होणार एक्स्पोची सांगता

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय असणार्‍या लायन्स क्लब संगमनेर सफायर आयोजित सफायर बिझनेस एक्स्पोला नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 16 वर्षांपासून सुरू असलेल्या या सफायर बिजनेस एक्स्पोमध्ये यावर्षी गर्दीचा उच्चांक झाला आहे. फन, फुड आणि शॉप अशी या एक्स्पोची थीम आहे. विविध व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने गर्दी होत आहे. महिला वर्ग गृहपयोगी वस्तू, साडी, ड्रेस मटेरियल, घरकामातील वस्तू, किचनमधील दैनंदिन गरजेच्या वस्तू, फर्निशिंग, लहान मुलांच्या वस्तू यांची खरेदी करण्यासाठी अलोट गर्दी करीत आहेत. शालेयपयोगी माहिती, विविध क्लासेस, नवीन शालेय प्रवेश यासाठी शालेय विद्यार्थी गर्दी करीत आहेत. सर्वच वयोगटातील व्यक्ती फन गेम्स मध्ये आनंदाने सहभाग घेत आहेत. खाण्याचा खजिना असलेल्या फुड स्टॉलमध्ये चविष्ट आणि रूचकर पदार्थ उपस्थितांची भूक भागवत आहेत. एकूणच सफायर बिझनेस एक्स्पोने संगमनेरकरांच्या मनोरंजनाची भूक भागवली आहे.


लायन्स क्लब संगमनेर सफायर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. क्लबचे अध्यक्ष अतुल अभंग, सेक्रेटरी जितेश लोढा आणि खजिनदार कल्पेश मर्दा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राण्यांसाठी साहित्य वाटप, ग्रामिण भागातील गरजू विद्यार्थांना शालेय कीटचे वाटप, गरजू मुलींना सायकलचे वाटप, दिवाळीमध्ये अनाथ मुलांसाठी दिवाळी मेळा, सफायर आयडॉल गायन स्पर्धा, सफायर मॅरेथॉन, शालेय विद्यार्थांसाठी क्रिकेट स्पर्धा, भजन स्पर्धा असे अनेक उपक्रम राबविले आहेत.

दोन दिवस जास्तीत जास्त संख्येने
सहभागी व्हावे – श्रीनिवास भंडारी

सफायर बिझनेस एक्स्पोचे प्रकल्प प्रमुख म्हणून लायन्सचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, प्रफुल्ल खिंवसरा, अतुल अभंग आणि सर्वच पदाधिकारी जीवतोड मेहनत घेत आहेत. बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 ही या सफायर बिझनेस एक्स्पोची सांगता होणार असून या दोन दिवसात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख