अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात घालून नट बोल्टविना धावते बस

खिळखिळ्या बस देतात अपघाताला निमंत्रण, आगार प्रमुखाचे दुर्लक्ष
नागरीकांनी थांबवली बस, मोठी दुर्घटना टळली

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – जुनाट व खिळखिळ्या झालेल्या एसटी बसेस पैसे वाचवण्यासाठी किंवा अधिक पैसे कमविण्यासाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालून सुसाट धावत असतात. परंतु या सुसाट धावणार्‍या बसच्या चाकांचे नट बोल्ट खिळखिळे होऊन रस्त्यात पडत असताना वाहक व चालकांचे मात्र दुर्लक्ष होते. परंतु सुज्ञ व जागृत नागरीकांनी वेळीच धोका ओळखत ही बस थांबवली आणि मोठी दुर्घटना टळली. ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील जुन्या पोस्ट ऑफिस जवळ घडली.


संगमनेर आगाराची एसटी बस एमएच -07, सी 7116 ही बस सकाळी नान्नज – पारेगाव फेरी मारून आली होती. तर दुपारी ही बस तालुक्यातील ओझर येथे जात होती. दरम्यान या बसमध्ये ग्रामीण भागातील प्रवासी व शाळकरी विद्यार्थी यांचा मोठा भरणा होता. ही बस बसस्थानकातून निघाल्यानंतर या बसच्या एका बाजूचे चाक डगडग करीत होते. या चाकाचे नट हळूहळू खाली गळून पडत होते. मात्र याचा चालक व वाहकाला कोणताही अंदाज न आल्याने ते भरधाव वेगाने बस पुढे नेत होते. दरम्यान ही बस अवघ्या काही अंतरावर शहरातील जुन्या पोस्ट आली असता इतर वाहन चालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेत या बसला थांबविले. चाकाचे नटबोल्ट पडत असतांना व कोणत्याहीक्षणी या बसचे चाक निखळून पडून भीषण अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने सुज्ञ नागरीकांनी वेळीच वाहन चालकाच्या ही घटना लक्षात आणून दिल्याने मोठी दुघटना टळली. बस अगारातून फिटर आल्यानंतर व सदर चाके दुरूस्त केल्यानंतर ही बस पुढे मार्गस्थ झाली. मात्र तो पर्यंत अतील प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

नेहमी तोट्यात असणारी बस आता फायद्यात येत असतांना अनेत आगार अजूनही मुदतबाह्य, खराब, खटारा, गळक्या बस रस्त्यावर धावत ठेवतात. ग्रामीण भागातील निकृष्ठ रस्ते, त्यात या खराब बस यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचा जीव कायमच टांगणीला लागलेला असतो. काही दिवसांपुर्वी पिंपरणे येथे देखील अशाच प्रकारे खराब बस पलटी झाली होती. तर काल सदर बस अपघातग्रस्त होता होता वाचली. दरम्यान या घटनेची आगार व्यवस्थापक यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना याबाबत त्यांना कुठलीही कल्पना नसल्याचे दिसून आले. यावरून येथील सावळा गोंधळ लक्षात येतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख