अमृतवाहिनीमध्ये राष्ट्रीय पातळीवर इंडस्ट्री प्रायोजित एक्सकॅलिबर 2K24 टेक फेस्टचे आयोजन

देशातील विविध भागातील विद्यार्थी नोंदवत आहेत सहभाग

संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘ ऑटोमेशन अँड रोबोटिक्स ‘ विभाग व स्टुडंट असोसिएशन ऑफ ऑटोमेशन अँड रोबोटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य अश्या टेक फेस्टचे आयोजन करण्यात आले असून “एक्सकॅलिबर 2 के 24” हा टेक फेस्ट दिनांक 18 एप्रिल 2024 ते 20 एप्रिल 2024 या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे .

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय व ऑटोमेशन अँड रोबोटिक्स विभाग हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करीत असतो या सर्व गोष्टींचा मुख्य हेतू हाच असतो की अमृतवाहिनीचा विद्यार्थी हा एक सर्व गुण संपन्न विद्यार्थी बनला पाहिजे .

विशेष म्हणजे या टेक फेस्टच्या सर्व व्यवस्थापन व नियोजनामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मोलाचे योगदान देत आहेत .खास म्हणजे या टेक फेस्ट साठी देशातील विविध भागातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आहेत .

सदर टेक फेस्टची सर्व माहिती https://excalibur-2k24.netlify.app/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

” एक्सकॅलिबर 2 के 24″ या टेक फेस्ट अंतर्गत ” रोबोवॉर, ड्रोन रेसिंग , पेपर प्रेझेंटेशन,लाईन फॉलोवर ,रोबो प्रोग्रामिंग,लेथ वॉर, डिजीटल पोस्टर प्रेझेंटेशन,प्रोजेक्ट एक्सीबिशन आणि इ- स्पोर्ट्स इ. ” स्पर्धांचा समावेश आहे .

या टेक फेस्ट साठी विविध रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रातील ( RUSHAS Engg. Pvt. Ltd. , AIMA, i Robotics, SANSUN,EAICON Automation,JANUS Automation ,GLOBAL SOFT, PROLIFIC,NANDINI Engg., दैनिक युवावार्ता इ.) कंपन्यांनी प्रायोजकत्व दिलेले आहेत .

या टेक फेस्ट साठी संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयुताई देशमुख ,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री .अनील शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एम . ए. व्यंकटेश व विभाग प्रमुख मा. डॉ. विलास शिंदे तसेच कार्यक्रम व्यवस्थापक मा.श्री. हेमंत पठाडे व विभागातील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख