औद्योगिक वसाहतीतील चोरीप्रकरणी नगर पथकाची कारवाई

दाेन ताब्यात, तिघे फरार

संगमनेर शहरासह तालुक्यात वाढत्या चोर्‍याने नागरीक भयभीत आहे. तर औद्योगीक वसाहतीत वारंवार चोर्‍या होत असतांना येथील उद्योजक मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत सापडत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारावी, उद्योजकांना संरक्षण मिळावे अशी मागणी वारंवार करीत असतांना त्यातडे डोळेझाक केली जाते. दरम्यान येथील चोरी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतांना नगरच्या एलसीबी पथकाने कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. त्यामुळे येथील पोलीस नेमके करतात काय? असा प्रश्न निर्माण होते.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील औद्योगिक वसाहतीत असणार्‍या प्रथमेश ऐश्वर्या ट्रान्सफॉमर्स नावाच्या कंपनीमधून 1 लाख 7 हजार 76 रुपये किमतीची कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घुलेवाडी शिवारातून मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


विश्वजित वसंतराव कुलकर्णी (वय 55, रा. मालपाणीनगर, घुलेवाडी) यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात चोरी प्रकरणी फिर्याद दिली होती.
दरम्यान पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार आहेर यांनी पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, पोलिस कॉन्स्टेबल रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, चालक संभाजी कोतकर यांचे पथक याकामी नियुक्त केले होते.
या पथकाने रविवारी घटना घडलेल्या ठिकाणचे तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहिती काढत असताना या गुन्ह्यातील आरोपी संदीप ऊर्फ जब्या संजय वाल्हेकर (रा. संगमनेर) व त्याचे इतर साथीदार घुलेवाडी येथे लपल्याची माहिती या पथकाला मिळाली. या पथकाने तत्काळ घुलेवाडी येथे शोध घेतला असता संदीप ऊर्फ जब्या संजय वाल्हेकर (वय 24, रा. वेल्हाळे रोड, संगमनेर), निखिल ऊर्फ अजय विजय वाल्हेकर (19) यांना ताब्यात घेतले. तर सागर बाळू गायकवाड (रा. साठेनगर, घुलेवाडी), अक्षय सावन तामचीकर (रा. भाटनगर, घुलेवाडी) हर्ष ऊर्फ चिक्या अशोक वाकचौरे (रा. घुलेवाडी) हे इतर आरोपी फरार झाले. यातील प्रमुख आरोपी संदीप ऊर्फ जब्या संजय वाल्हेकर याच्याविरोधात चोरी व घरफोडीचे संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. तसेच यातील दुसरा आरोपी निखिल ऊर्फ अजय विजय वाल्हेकर याच्याविरोधातही संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दरोडा व घरफोडीचे 3 गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हे या वायरमधून कॉपरची तार काढून त्याची विक्री करत होते. त्यांच्याकडून पोलीसांनी 36 हजार 500 रूपये किंमतीची कॉपरची तार जप्त केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख