मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद

30 मोटारसायकली हस्तगत

युवावार्ता (प्रतिनिधी)
कोपरगाव – महिला साथीदारांच्या मदतीने साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शिर्डी, येथून मोटारसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. त्यांच्याकडून 22 लाख 82 हजार रुपये किमतीच्या 30 मोटारसायकली हस्तगत केल्या असून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरी करणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला होता. सदर मोटारसायकल चोरी करणार्‍या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना आदेश दिले होते.
या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव, बाळासाहेब मुळीक, भाऊसाहेब काळे, अतुल लोटके, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, संदीप चव्हाण, संतोष खैरे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, बाळासाहेब गुंजाळ, रणजित जाधव, चालक उमाकांत गावडे यांचे विशेष पोलीस पथक स्थापन करून जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची माहिती घेऊन पथक रवाना केले. पथक शिर्डी परिसरामधील चोरीस गेलेल्या मोटारसायकल ठिकाणाची पाहणी करून तसेच पोलीस स्टेशन अभिलेखाची खात्री करता शिर्डी परिसरामधून विशेषत: होंडा कंपनीच्या जास्त गाड्या चोरी झाल्याचे निदर्शनास आले.


त्यादृष्टीने अशाप्रकारे गुन्हे करणारे अहमदनगर तसेच आजुबाजुच्या जिल्ह्यांमधील मोटारसायकल चोरीमधील आरोपींची माहिती काढत असताना पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अन्वर मन्सुर शेख रा. पानमळा, कोपरगाव हा चोरीची मोटारसायकल घेऊन शिर्डी ते कोपरगाव जाणारे रोडवर सावळीविहीर फाटा या ठिकाणी थांबलेला आहे. पोलीस पथकाने सावळीविहीर परिसरामध्ये सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेतले.
त्याचेकडे चोरीच्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्याने बबन धोंडीराम मोगरे रा. रावळगाव, ता. मालेगाव, शाहीस्ता मन्वरअली सय्यद, रा. कोपरगाव, माया दिनेश चौधरी रा. कालिकानगर, शिर्डी, ता. राहाता (फरार), अंकुश भावसिंग चव्हाण रा. रिठ्ठी मोहर्डा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर यांच्यासह अहमदनगर, नाशिक, मालेगाव, परभणी या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन मोटारसायकली चोरी केलेल्या असल्याची कबुली देऊन विविध ठिकाणावरुन 22 लाख 82 हजार रुपये किमतीच्या एकुण 30 मोटारसायकल काढुन दिलेल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख