नोटांचे नंबर लिहण्याच्या बहाण्याने 58 हजारांची फसवणूक

बँक खात्यात रुपये भरत असताना लांबविले पैसे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – ‘काका तुमच्या चलन स्लिपवर नोटांचे नंबर टाकून देतो’ असे म्हणत अज्ञात तरुणाने 53 वर्षीय शेतकर्‍याने बँकेत भरण्यासाठी आणलेल्या रुपयांतून 58 हजार रुपये लांबविले. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील जाणता राजा मैदान येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तू लहानभाऊ गुंजाळ (वय 53, रा. पिंपरणे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयडीबीआय बँकेची जाणता राजा मैदान येथे शाखा आहे. तेथे गुंजाळ हे रुपये भरण्यासाठी गेले होते. त्यांच्याजवळ आलेला अज्ञात तरुण ते रांगेत उभे असताना त्यांच्याजवळ आलेल्या आलेल्या अज्ञात तरुणाने त्यांना ’काका तुमच्या चलन स्लिपवर नोटांचे नंबर टाकून देवो’ असे म्हणाला. त्याने गुंजाळ यांना बाजूला घेतले, त्यांच्या हातातील पैशांचे बंडल घेऊन स्लिपवर नोटांचे नंबर टाकत असताना पैशांचे बंडल खालीवर केले. गुंजाळ यांची नजर चुकवून त्याने 500 रुपये किमतीच्या 116 नोटा असे एकूण 58 हजार रुपये लांबविले. बँक खात्यात रुपये भरत असताना त्यात 58 हजार रुपये कमी असल्याचे गुंजाळ यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख