म्हाळुंगी पुल उभारणीच्या प्रक्रियेला अखेर सुरूवात

आसपासच्या भाविकांनी, विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केले समाधान

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहराजवळील म्हळुंगी नदीवरील पुल खचल्याने मागील दीड ते दोन वर्षांपासून आजूबाजुच्या नागरीकांचे प्रचंड हाल सुरू होते. त्यातच या पुलाच्या खचणे व पुन्हा बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय श्रेयवाद रंगल्याने या पुलाचे काम रखडले होते. अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर या पुलासाठी निधी मंजूर झाल्यानंतर काल अखेर पालीकेच्यावतीने पुलासाठी निविदा प्रकाशित करण्यात आली. या निविदेसाठी 15 दिवसांची मुदत असून त्यानंतर लवकरच नविन पुल उभारणीला सुरूवात होणार आहे.
म्हाळूंगी नदीवरील पुलाचा एक भाग खचल्यामुळे साईनगर, पंपिंगस्टेशन, व गंगामाईघाट, शाळा, मंदीरे यांचा संपर्क तुटला होता. मोठ्या वाहनांना ये-जा करण्यास अडचण आल्याने नागरीकांचे व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू होते. या पुलाची लवकरात लवकर निर्मिर्ती करण्यासाठी म्हाळुंगी पुल बनाव कृती समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून अनेकवेळा आंदोलने देखील करण्यात आली. पालीका प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र प्रश्न सुटत नव्हता. याच दरम्यान म्हाळुंगी पुलासाठी निधी मिळावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आ. बाळासाहेब थोरात यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली. तसेच निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले. तर दुसरीकडे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील या पुलाच्या कामात लक्ष घालत निधी मंजूरीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र हे प्रयत्न होत असतांना त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. राजकारण सुरू असतांना निधी मात्र मिळत नव्हता आणि पुल काही होत नव्हता. अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना आ. बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीतून शॉपिंग सेंटरसाठी आलेला 7 कोटींचा निधी या म्हाळुंगी पुलासाठी वर्ग करण्यात आला. शॉपिंगसेंटरचे काम बंद ठेऊन अखेर पुलाच्या कामाला प्राधान्य देत नगरपालीकेने या कामाची जाहीर निविदा सुचना आज वर्तमानपत्रातून जाहीरातद्वारे जाहीर केली. सदर पुलाची अंदाजीत रक्कम 5 कोटी 76 लाख 68 हजार 237 रूपये अशी ठेवण्यात आली असून ई-निविदाद्वारे ही निविदा भरावयाची आहे. सदर निविदेची मुदत 15 दिवसांची असून ज्या कंत्राटदाराला ही निविदा मिळेल त्याने तात्काळ या कामास सुरूवात करावायची आहे. नविन पुलाच्या कामाची प्रक्रिया अखेर सुरू झाल्याने या पुलासाठी आंदोलन करणारे साईनगर, घोडेकरमळा, पंपींगस्टेशन यासह आसपासच्या भावीकांनी, विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या पुलाचे काम मजबूत व उत्कृष्ठरित्या करावे अशी मागणी देखील केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख