गुढीपाडवा निमित्ताने 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीसाठी ग्राहकांना मिळणार 30% पर्यंत सुट
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरातील सुवर्ण दालनातील एक विश्वसनीय नाव असलेले एम जी काजळे या जाणता राजा रोडवरील शाखेच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी सुवर्ण दागिन्यांवरील मजूरीवर तीस टक्के सुट त्याचबरोबर कोणत्याही दुकानातील दागिने बदलीस शुन्य टक्के घट अशी अनोखी भेट देण्यात येत आहे.
अनेक वर्षाची मेहनत, ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम या बळावर काजळे परिवाराने संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. शहरातील अशोक चौक या शाखा एक मधून नवीन नगर रोड, जाणता राजा रोडवर भव्य अशी दुसरी शाखा एम जी के मे. माधव गंगाधर काजळे अॅन्ड सन्स हे भव्य दालनाचा प्रवास झाला आहे. शुध्द आणि खात्रीशीर त्याचबरोबर ग्राहकांची आवड निवड जोपासून एक गॅम पासून तयार दागिने, कानातील, गळ्यातील, नाकातील नाजूक दागिने, दागिण्याचा सेट, अंगठी, ब्रेसलेट, नेकलेस, मनी मंगळसूत्र, विविध प्रकारचे सुवर्ण अलंकाराने हे दालन सजले आहे. सोन्याच्या दागिण्यासोबतच चांदीचे पैंजन, जोडवे, बाजूबंद, कंबरपट्टा, वाळे अनेक प्रकारचे दागिने देखील आकर्षक डिजाइन मध्ये उपलब्ध आहे. एमजीके या सुवर्ण दालनाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त व गुढीपाडवा निमित्ताने 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीसाठी असंख्य ग्राहकांसाठी या दालनात मजुरीवर देण्यात आलेल्या तब्बल तीस टक्के सुट मुळे ग्राहकांना मोठा धनलाभ होणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मे. माधव गंगाधर काजळे अॅन्ड सन्स च्या वतीने करण्यात आले आहे.