संगमनेरचे परिचय संमेलन देशातील माहेश्वरी समाजाला दिशा देणारे – मधुसूदन गांधी


बाराव्या परिचय संमेलनाची सांगता; देश-विदेशातील आठशेहून अधिक उपवरांची उपस्थिती


संगमनेर, प्रतिनिधी
संगमनेर मधील परिचय संमेलन देशातील माहेश्वरी समाजाला दिशा देणारे आहे. येथील राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनिष मालपाणी आणि त्यांच्या समर्पित कार्यकर्त्यांनी मागील बारा वर्षांपासून अखंड आयोजन करून या संमेलनाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. अत्याधुनिक तंत्राचा वापर करून होणारे हे संमेलन म्हणजे उपवर युवक-युवती आणि त्यांच्या परिवारांना एक हक्काची आणि विश्वासाची व्यवस्था म्हणून देश-विदेशात सर्वत्र नावलौकिक झाला आहे. सलग बारा वर्षे इतका मोठा अखिल भारतीय स्तरावरील उपक्रम आयोजित करणे हा देखील एक विक्रमच म्हणावा लागेल असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष, उद्योगपती मधुसूदन गांधी यांनी येथे काढले.
राजस्थान युवक मंडळाने महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, संगमनेर माहेश्वरी समाज आणि मालपाणी परिवार यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या बाराव्या अखिल भारतीय माहेश्वरी युवक-युवती परिचय संमेलनाचे उद्घाटन गांधी यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. स्वागताध्यक्ष उद्योगपती राजेश मालपाणी, उद्योजक विजय आसावा, अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मनेश बाहेती, माहेश्वरी पंच ट्रस्टचे सरपंच विश्वनाथ कलंत्री, संगमनेर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, माहेश्वरी सिनिअर महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना मालपाणी, माहेश्वरी ज्युनिअर महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिमा चांडक, राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनिष मालपाणी, कार्याध्यक्ष सम्राट भंडारी, उपाध्यक्ष सुदर्शन नावंदर, सचिव ओंकार इंदाणी,कोषाध्यक्ष व्यंकटेश लाहोटी, माजी कार्याध्यक्ष रोहित मणियार, प्रकल्प प्रमुख श्री. सुमित अट्टल व श्री नंदन कासट आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना गांधी यांनी आपल्या भाषणात माहेश्वरी समाजातील विवाह संबंध जुळण्याच्या समस्येवर चौफेर विचार मंथन करून सर्वांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. युवक-युवती आणि परिवारजन या सर्वांनीच आपल्या अवास्तव अपेक्षांचे ओझे कमी करण्याची गरज आहे. एकतर विवाह मोठ्या मुश्किलीने जमतात. त्यात अलीकडच्या काळात झटपट फारकत होण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आंतरजातीय विवाह करून मुली अन्यत्र जात आहेत. माहेश्वरी समाजाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. बुद्धिमान तसेच रोजगार उपलब्ध करून देणारा समाज असा नावलौकिक असलेल्या आपल्या समाजाने वेळीच सावध होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.
मनिष मालपाणी यांनी मंडळाच्या मागील बारा वर्षांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. विवाह सुलभतेने व्हावेत यासाठी केवळ मोठ्या शहरात धाव घेण्याची प्रवृत्ती युवतींनी सोडून द्यावी. छोट्या शहरात तसेच अगदी ग्रामीण भागात देखील अनेक माहेश्वरी युवक समर्थपणे उद्योग व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या भक्कम झाले आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वागताध्यक्ष राजेश मालपाणी म्हणाले की, परिचय संमेलन ही सध्याच्या धावपळीच्या जीवनात गरजेची बाब झाली आहे. एकाचवेळी एकाच ठिकाणी अनेक स्थळे बघायला मिळतात. या निमित्ताने प्रकाशित होणारी परिचय पुस्तिका म्हणजे गाईडची भूमिका करणारी सक्षम पुस्तिका असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष सम्राट भंडारी यांनी केले. विश्वनाथ कलंत्री व संगमनेरमधील माहेश्वरी समाजाचे कार्यकर्ते ओमप्रकाश आसावा यांचीही यावेळी भाषणे झाली. रचना मनिष मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या परिचय पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनिष मणियार, सुमित अट्टल, उमेश कासट, सागर मणियार, नंदन कासट यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दीपक करवा, महेश झंवर, सुभाष दरक, सुरेश बिहाणी, गिरिश सोमाणी, निर्मला मणियार, रिता कासट, रंजना जाजू, सचिन बाहेती, शैला पलोड, गणेश बाहेती, कल्पना राठी इत्यादी कार्यकर्ते सन्मानाचे मानकरी ठरले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान महेश प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन-वंदन करण्यात आले. रितिका भंडारी, मेघा अट्टल, प्रियंका मणियार, भावना कासट, साक्षी आसावा, श्वेता आसावा, स्मिता मणियार यांनी सुस्वर गायनातून महेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ आसावा व ऋषिकेश पोफळे यांनी तर आभार सुदर्शन नावंदर यांनी मानले. या संमेलनासाठी देश विदेशातून आलेल्या सुमारे आठशे युवक-युवती आणि त्यांचे पालक, नातेवाईक, संगमनेर मधील माहेश्वरी समाज असा मोठा जनसमुदाय मालपाणी क्लबच्या विशाल सभा मंडपात उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजस्थान युवक मंडळाचे सुमारे दोनशे कार्यकर्ते विविध समित्यांच्या माध्यमातून मागील तीन महिन्यांपासून परिश्रम घेत होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख