सणाच्या पार्श्वभूमीवर दुकांनांची वेळ वाढून द्यावी

व्यापारी असोसिएशनची प्रशासनाकडे मागणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सणासुदीच्या दिवसात दुकान बंद करण्याची वेळ ही रात्री 11.30 वाजेपर्यंत करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलिस निरिक्षक भगनान मथूरे यांना देण्यात आले.
यावेळी संगमनेर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष योगेश कासट, उपाध्यक्ष सुमेध संत, सह सेक्रेटरी जुगलकिशोर बाहेती, माजी अध्यक्ष शिरिष मुळे, ओमप्रकाश आसावा, प्रकाशजी कलंत्री, प्रकाश राठी, ज्ञानेश्‍वर कर्पे, सोमनाथ कानकाटे, राजेंद्र वाकचौरे, ओंकार शहरकर, आबासाहेब शिंदे, मनिष गोरे, विशाल शिेदे, धनंजय फटांगरे, श्रीपालसिंह राजपूत, भरकादेवी छगनसिंह राजपूत, कैलास ढोले, व्यवसाथक अविनाश पुलाटे आदी मोठया संख्येने व्यापारीबंधू उपस्थित होते.


या निवेदनात म्हंटले आहे की, गेल्या काही दिवसापासून संगमनेर पोलिस प्रशासनाकडून, संगमनेर शहरातील सर्वत्र दुकाने रात्री 10 वाजेनंतर बंद करण्यात येत आहे. अनेक व्यापारी बंधूंना यामुळे अडचण निर्माण होत आहे. शहरातील सर्वच वर्गातील व्यापारी बंधूची आमच्याकडे या वेळे बाबत वारंवार विचारण होत आहे. अवघ्या महाराष्ट्रात, संगमनेरचा व्यापार नावाजलेला आहे, येथील समृध्द व्यापार हा शहराचा आधार आहे, व्यापारातूनच रोजगार निर्मिती होते आहे. संगमनेर शहर विकसनशील आहे, बदलत्या काळानुरूप व्यापार पध्दती, वेळेतही बदल होत आहे. शासनाने 24 तास दुकाने खुली, अशा पध्दतीचे मुक्त व्यापार धोरण अवलंबीत आहे. असे असताना संगमनेरात दुकाने बंद करण्याची वेळही अगोदरच्या प्रचलीत वेळे पेक्षाही एक तासाने कमी करण्यात आल्याने व्यापार उदयोगावर त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. अगोदरच मोठ्या प्रमाणार चालणारे बडया कंपनींच्या मल्टी मॉल ऑनलाईन विक्री सुविधा अशा अनेक स्पर्धच्या समस्यासमवेत व्यापारी वर्ग लढत आहे. त्यातच आपला हा वेळेचा निर्णय शहरातील व्यापार उद्योग वाढी करीता अडचणीचा वाटतो आहे. सध्या दिपावली सणासुदीचे दिवस चालू आहेत. या सणासुदीच्या काळात अनेक दुकानांची रात्री आवरासावर चालू असते. बरेच लोक रात्री उशीरा कामावरून घरी येतात. नंतर बाहेर दिपावलीच्या खरेदी करण्यासाठी त्यांना बाहेर पडावे लागते. छोटे-लहान व्यवसायिक जसे, पानस्टॉल धारक, हातगाडीवाले, आईस्क्रीम, कुल्फी विक्रेते, चहा-दुध विक्रेते, चायनीज पदार्थ विक्री करणारे, सलून वाले आसे बहूतांशी व्यापारी बंधू यांना सुध्दा अडचणीचे होते. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपला हा निर्णय योग्य असेलही परंतू या सणासुदीच्या दिवसात तरी किमान 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेबर या कालावधी करीता रात्रौ दुकान बंद करण्याच्या वेळ ही रात्रौ 11.30 वाजे पर्यत करण्यात यावी. शक्य असल्यास पुढील काळातही सदरची वेळ ही अगोदरच्या प्रचलित वेळे सारखी रात्रौ 11ः00 वाजता करावी. सदर निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री ना. राधाकृष्णजी विखे पाटील आ. बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी, उपविभागिय अधिकारी, उपविभागिय पोलिसअधिकारी, आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख