आरोटे यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

मुंबईतील जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत 22 ते 28 एप्रिल दरम्यान हाेणार आहे हे चित्रप्रदर्शन

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले – रंगकुंचल्यांचा शिल्पकार म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या चित्रकार सुधीर आरोटे यांच्या चित्रांचे जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरले आहे. चित्रकार आरोटे हे अकोले तालुक्यातील इंदोरी येथील रहिवासी आहेत, ग्रामीण भागातील चित्रकाराचे एवढ्या मोठ्या आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन भरल्याने आरोटे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे हे प्रत्येक चित्रकाराचे स्वप्न असते. मात्र हा प्रवास अतिशय खडतर व कठीण असताे. कठोर मेहनत आणि जिद्द यांच्या जीवावर चित्रकार आरोटे यांनी हे स्वप्न साकार केले. जगप्रसिद्ध शिल्पकार व नगर जिल्ह्याचे भूषण प्रमोद कांबळे यांनी या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केले. जहांगीर आर्ट गॅलरीतील चित्रांना अनेक सेलिब्रिटी, उद्योजक, विचारवंत व कलाक्षेत्रातील धुरीणांकडून मागणी असते. आरोटे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चित्रकलेचे शिक्षण घेत मुंबई नगरीत आपले स्थान निर्माण केले. शाळेचे फलक लेखन असो वा भिंतीवरील रंगकाम असो, संधी मिळाली की आपली कला दाखवायची ही तळमळच त्यांना जहांगीर कला गॅलरीकडे घेऊन गेली. निसर्ग चित्र, वस्तूंची वस्तू चित्र असो वा व्यक्तिचित्र यांचा हुबेहूबपणा त्यांच्या चित्रांमध्ये दिसून येतो. 22 ते 28 एप्रिल दरम्यान हे चित्रप्रदर्शन जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईत होत असून अकोले तालुक्यातील जनतेने या प्रदर्शनास नक्की भेट द्यावी, असे आवाहन चित्रकार सुधीर आरोटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख