गुंजाळवाडी ग्रामपंचायतीत काँग्रेसचा बोलबाला

0
1579

यशोधन कार्यालयात विजयी उमेदवारांचा भव्य सत्कार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या गुंजाळवाडी ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने जोरदार विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिले आहे.
जनतेतून निवडून येणार्‍या सरपंच पदाचे उमेदवार नरेंद्र उर्फ अमोल संभाजी गुंजाळ हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर त्यांच्या शेतकरी विकास मंडळाचे सदस्य पदाचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे. मतदारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना नाकारत पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती एक हाती सत्ता दिली आहे.


संगमनेर शहरालगत असणार्‍या त्याचबरोबर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार्‍या गुंजाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे वरीष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहे. शहरालगत असल्याने गावाचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. तसेच नवीन समस्या वाढत आहे. परंतु माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी एकदिलाने काम करत अनेक प्रश्‍न मार्गी लावले. नुतन विजयी सरपंच अमोल उर्फ नरेंद्र गुंजाळ यांनी उपसरपंच म्हणून मागील काळात भरीव अशी कामगिरी केली. मोठा जनसंपर्क, नागरीकांच्या सूचनांचे पालन, तक्रारींचे निवारण, भरीव निधीसाठी वरिष्ठांकडे सततचा पाठपुरावा यामुळे नरेंद्र गुंजाळ यांच्या कामावर विश्‍वास व प्रेम व्यक्त करत ग्रामस्थांनी मोठ्या मताधिक्याने विजयी केले. तर समोरील भाजपच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव झाला. या विजयानंतर विजयी उमेदवारांवर गावात गुलालाची उधळण करण्यात आली. तर यशोधन कार्यालयात विजयी उमेदवारांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या विजयानंतर नुतन सरपंच अमोल गुंजाळ यांनी मतदारांचे आभार मानत गावात विकासाची सुरू असलेली गंगा अशीच वाहत राहिल असे आश्‍वासक केले. गुंजाळवाडी ग्रामपंचायतीत दोन महिला सदस्य आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. यात सौ. नैनाताई कैलास राहणे, सौ. संगिता बर्डे यांचा समावेश आहे. तर सदस्य म्हणून पंडित भास्कर गुंजाळ 667, उज्वला सुभाष गुंजाळ 869, भाऊसाहेब रखमा गुंजाळ 782, अतुल साहेबराव अभंग 521, आरती आणि गुंजाळ 871, सविता बाबासाहेब गुंजाळ 739, अशोक प्रभाकर गुंजाळ 452, सतीश रमेश गुंजाळ 468, पोपट कारभारी अरगडे 953, अमोल विलास गुंजाळ 536, ललिता मारुती शिंदे 695, मच्छिंद्र रामचंद्र राहणे 212, संगीता शांताराम अरगडे 202, मते पडून विजयी झाले.
यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजपला या ठिकाणी खाते उघडता आले नाही. या विजयामुळे तालुक्यातील जनता आ. थोरातांच्या मागे उभे असल्याचे स्पष्ट होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here