लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरचे माजी सेक्रेटरी आणि प्राध्यापक जितेश लोढा यांना पितृशोक

संगमनेर:
अतिशय बोलका स्वभाव, लहान-मोठ्या सर्वांशी प्रेमाने वागणं, तोंडभरून बोलणं, विचारपूस करणं या स्वभावाचे श्री. लालचंद प्रेमराज लोढा उर्फ लालूकाका (रा. नांदुरखंदरमाळ) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ते लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरचे माजी सेक्रेटरी तसेच प्राध्यापक जितेश लोढा यांचे वडील होते.लोढा कुटुंबीय हे नांदुरखंदरमाळ येथील मूळचे व्यापारी कुटुंब असून, गावाच्या मध्यभागी त्यांची वस्ती होती. लालचंद उर्फ लालूकाका हे अतिशय प्रेमळ आणि सामाजिक जाणिवा असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्या काळी वस्तूविनिमयाच्या स्वरूपात चिपटं-मापटं बाजरी-ज्वारी दिली घेतली जायची आणि आवश्यक मालाची देवाण-घेवाण केली जायची. त्यांच्या प्रयत्नांनी गावातील आणि व्यापारी संबंध अधिक दृढ झाले.

गावाशी नाळ कायम ठेवत गुढीपाडव्याच्या गावकीच्या मिटींगपासून भगवतीमातेच्या यात्रेपर्यंत किंवा विठ्ठलाच्या सप्ताहापर्यंत लालूकाका नेहमीच उपस्थित राहायचे. नंतर व्यापारानिमित्त लोढा कुटुंबाचे संगमनेर येथे स्थलांतर झाले. ते संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व्यापारी म्हणून बराच काळ कार्यरत होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांनी संपन्न असलेल्या या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने कै. लालचंद प्रेमराज लोढा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख