विहिरीच्या हिश्यावरून भावांमध्ये हाणामारी, चार जण जखमी

0
2021

१४ जणावर आश्वी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर
– तालुक्यातील खळी येथील कांगणे कुटुबांतच एका भावांने दुसऱ्या भावांकडे विहीरीचा हिस्सा मागितला, ही विहिर माझ्या क्षेत्रात असल्याने हिस्सा मिळणार नाही म्हटल्याचा राग आल्याने झालेल्या मारहाणीत एकाच कुटुबांतील चार जण जखमी झाले तर १४ जणावर आश्वी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
खळी येथील गोरक्षनाथ किसन कांगणे हे गुरुवार दि २७ जुलै रोजी दुपारी १ वाजल्याच्या सुमारास गट नं ४४७ या आपल्या क्षेत्रात असणाऱ्या जनावरांच्या गोठयाजवळ काम करत असताना बाबासाहेब किसन कांगणे, दिलीप बाबासाहेब कांगणे, शोभा दिलीप कांगणे, शैला बाबासाहेब कांगणे, सुभाष मुरलीधर कांगणे, मैना सुभाष कांगणे, जालिंदर सुभाष कांगणे, पोपट कारभारी कांगणे, सागर पोपट कांगणे, रामदास रघुनाथ कांगणे, प्रकाश विठ्ठल कांगणे, तेजस ज्ञानदेव कांगणे, रमेश राजाराम घुगे, अलकाबाई रमेश घुगे (रा. कांगणवाडी ‘ खळी ) हे सर्व जण समुहायाने आले व सुभाष मुरलीधर कांगणे व बाबासाहेब किसन कांगणे यांनी गट नं ४४७ क्षेत्रातील असणाऱ्या विहीरीत हिस्सा मागितला हे क्षेत्र फिर्यादीचे असल्याने या विहिरीत हिस्सा मिळणार नाही या राग आल्याने गोरक्षनाथ कांगणे यांच्यासह पत्नी ताराबाई, मुलगा विशाल व चैतन्य यांना शिवीगाळ व दमबाजी करत प्रकाश विठ्ठल कांगणे यांने गजाने पायावर व सागर पोपट कांगणे डोक्यात काठीने गोरक्षनाथ कांगणे यांना मारहाण करत जख्मी केले .

तर सुभाष मुरलीधर कांगणे यांनी गोरक्षनाथला जमिनीवर पाडून मारहाण केली . बघुन पत्नी व मुलांनी आरडा – ओरड केल्याने बाबासाहेब कांगणे यांनी ताराबाईच्या डोक्यात गंज मारला तर विशाल व चैतन्य यांना रामदास कांगणे यांने दगड मारुन व दिलीप कांगणे व सागर कांगणे यांनी लाथाबुक्यांनी मारुन जख्मी केले . जर आमच्या काही पोलिस केस केली तर एक – एकाचा बेत बघू असे दमबाजी करुन शिवीगाळ केली. गोरक्षनाथ कांगणे, पत्नी ताराबाई कांगणे, मुलगा विशाल व चैतन्य हे जख्मी झाल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here