पंचायत समिती परिसरातील विविध समस्यांसंदर्भात नागरिकांचे निवेदन

खड्डे, डिव्हायडर आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांसंदर्भात नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
संगमनेर पंचायत समिती परिसरामधील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त असून सोमवारी त्याचा उद्रेक दिसून आला. 4 महिन्यापूर्वी पूर्ण झालेल्या कोल्हार घोटी राज्य मार्गाची पावसाळ्यात दुर्दशा सुरु झाली असून रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागास या संदर्भात कल्पना दिली असता खड्डे बुजविण्याचे काम झाल्याचे सांगण्यात आले मात्र संबंधित ठेकेदाराकडून हे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. असा आरोप नागरिक करीत आहेत. गुंजाळनगर, पंचायत समिती, संगमनेर येथील स्थानिक नागरिकांतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागास विविध मुद्द्यावर या विविध विषयांचे लेखी निवेदन सोमवारी देण्यात आले.


या निवेदनात म्हटले आहे की, या रोडची काही ठिकाणी अवस्था अत्यंत दुर्दैवी झालेली असून रोज छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. यातून काही जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्‍न स्थानिक नागरिक विचारत आहेत? बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणार्‍या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने कमालीचा संताप व्यक्त केल्या जात आहे. खड्डे चुकविताना संतुलन बिघडल्याने कित्येक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. तसेच या राज्यमार्गचे काम करत असताना पंचायत समिती पासुन ते समनापुर पर्यंत बांधकाम विभागाने ठिकठिकाणी डिवाइडर कट ठेवलेले आहेत. येथील रहिवाशांची अशी मागणी आहे की जुन्या पंचायत समितीजी इमारत होती त्या इमारतीत देखील शासकीय कामकाज अजूनही चालू आहे. पंचायत समितीमधील शासकीय कर्मचारी व लोकांसाठी इथे क्वार्टर्स ची व्यवस्था केलेली आहे. त्या कर्मचार्‍यांची देखील जाण्या-येण्याचे हाल होत आहेत त्यामुळे जुन्या पंचायत समिती बिल्डिंगसमोर डिवाइडर कट ठेवावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांची व कर्मचाचार्‍यांनी या निवेदनात केली आहे.


ज्ञानमाता विद्यालय परिसरामध्ये अनधिकृत अतिक्रमणे वाढत असून याचा त्रास शालेय विद्यार्थी आणि आसपासच्या नागरिकांना होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर निर्णय घेऊन खड्डे दुरुस्ती, डिवाइडर कट व ज्ञानमाता परिसरातील अतिक्रमण प्रकरण सोडवावे अशी लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते इंजि. अमित गुंजाळ, इंजि. गोविंद गुंजाळ, गणेश गुंजाळ, शुभम गुंजाळ, अक्षय गुंजाळ, प्रवीण गुंजाळ, विजय गुंजाळ, प्रमोद अंब्रे, अनंत गुंजाळ, अजिंक्य नवले, सार्थक गुंजाळ, संदिप गुंजाळ, सुनिल गुंजाळ बंडु अण्णा गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, अनिल गुंजाळ, निलेश गुंजाळ, तुषार गुंजाळ, राहुल गुंजाळ, स्वप्निल गुंजाळ, अशोक गुंजाळ, भारत गुंजाळ, संतोष गुंजाळ, देवीदास गांडोळे, सचिन देशमुख, सुनिल भवर, अरूण भवर, बाळासाहेब जाधव, तुकाराम सातपुते, कुणाल सातपुते, सचिन सहाणे व इतर कार्यकर्त्यांनी केली.

तालुक्यातील रस्त्यांबरोबरच शहरातील रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. कित्येक दिवसांपासून रस्त्यांवरील खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असतांनाही संबंधित विभाग खड्डे बुजविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

नविन नगर रोड वरून ये – जा करताना सर्व नागरिकांना ज्ञानमाता विद्यालय परिसरात शाळा सुरु होण्याच्या व सुटण्याच्या वेळेस वाहतुकीचा नेहमी अडथळा होत असतो याचे कारण म्हणजे त्या परिसरात वाढलेली अतिक्रमण व वाढलेली टपरी धारकांची संख्या. यामुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये गैरवर्तनुकीचे प्रकार वाढलेले असून अंतर्गत वादाचे प्रमाण वाढलेले आहे. हे सर्व होत असताना घडलेल्या घटनेस जबाबदार कोण असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख