दुधप्रश्नी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

उपाेषणकर्त्यांची प्रकृती खालावली

शेतकरी धडकणार तहसील कार्यालयावर

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले – दुधाला 34 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी, गेल्या 6 दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी अकोले येथे आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारने 6 दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष करत असल्याने आज मंगळवारी राज्यभर तहसील कार्यालायवर दुध उत्पादक शेतकरी मोर्चे काढणार आहे. तर अकोले तहसीलमध्ये थेट जनावरे घुसवणार असल्याचा इशारा डॉ. अजित नवले यांनी दिला. दरम्यान या उपोषणास बसलेले डॉ. अजित नवले यांच्यासह संदिप दराडे, अंकुश शेटे यांची तब्यत खालवली आहे. सरकारने या दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न केल्यास प्राणाचे मोल देऊ असा इशाराही शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.


दुधाचे दर कोसळल्याने महाराष्ट्रभरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने आदेश देऊनही सहकारी व खाजगी दूध संघांनी हा आदेश पाळण्यास दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत नकार दिला आहे. सरकारच्या या निर्णयाविरूद्ध अकोले येथे सुरू असलेल्या उपोषणास राज्यभरातून पाठिंबा मिळत असून सरकारने तातडीने या प्रश्नात ठोस तोडगा काढावा असे आवाहन दूध उत्पादकांनी केले आहे. उपोषणास शेकडो ग्रामपंचायती व दूध संकलन केंद्रांनी ठराव करून पाठिंबा दिला आहे. आंदोलन स्थळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, आजी, माजी आमदार व खासदार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. दुधाला 34 रुपये भाव जोवर मिळत नाही व दुध भेसळ, वजन व मिल्कोमीटर काटमारी, खाजगी संस्थांना लागू असणारा कायदा आदी प्रश्नी कार्यवाही केल्या शिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले. दरम्यान सरकार या उपोषणाची दखल घेत नसल्याने संतप्त झालेले दुध उत्पादक थेट तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त करणार आहे. या आंदोलनात मिलिंद नाईकवाडी, डॉ. मोहन पवार, तुळशीराम कातोरे, महेश सोनवणे, राम एखंडे, शुभम आंबरे, भीमाशंकर मालूंजकर, सुनिल लोखंडे, नितीन डुमरे, निलेश गवांदे, दिपक पथवे यासह अनेक शेतकरी नेते या आंदोलनाचे संचालन करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख