आरक्षणासाठी पुन्हा जरांगे पाटलांचे उपोषण

0
1799

मुख्यमंत्र्यांचे आवाहन फेटाळले, आंदोलन उग्र न करण्याची समाजाला साद

जालना (वृत्तसंस्था)
मराठा समाजाचे नेत मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारला दिलेला वेळ संपल्याने जरांगे यांनी उपोषणाची भूमिका ठाम ठेवली आहे. आजपासून मी उपोषणाला बसतोय. सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करतंय. सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेट संपला, 41 दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, असं जरांगे यांनी म्हंटले आहे.
अन्न-पाणी घेणार नाही, औषधं घेणार नाही. गावात कुणी आले तर त्यांना शांततेत माघारी पाठवा, असे आवाहन जरांगे यांनी गावकर्‍यांना केले आहे. उग्र आंदोलन करू नका, आंदोलन शांततेने करा, आत्महत्या करू नका, असंही जरांगे यांनी म्हंटले आहे. सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करते. सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला, 41 दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात करत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की 14 सप्टेंबर तारखेला मुख्यमंत्री यांनी 1 महिन्याचा वेळ मागितला आणि आरक्षण देण्याचा शब्द दिला होता,म्हणून उपोषण सोडलं होतं. आज साखळी उपोषणाचे आज पुन्हा आमरण उपोषणात रूपांतर करत आहे. आता या उपोषणात पाणी आणि औषध उपचार घेणार नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.सरकार आणि मुख्यमंत्री यांचा आणि सर्व पक्षांचा सन्मान घेऊन, त्यांनी (पक्षांनी) सर्वांनी मिळून ठराव घेऊन, आम्ही 40 दिवस दिले मात्र, कोणाकडूनच आजवर आरक्षण देण्यात आलं नाही. सरकारकडून कालपर्यत आशा होती, मात्र, सरकारकडून आणि सर्वच पक्षांकडून झाले नाही, त्यामुळे आज आमरण उपोषण सुरू केले आहे.
जरांगे यांनी सरकारल प्रश्‍न विचारत आरोपही केले आहेत. सर्व गुन्हे दोन दिवसात मागे घेऊ असे म्हटले होते, पण ते झाले नाही, त्यामुळे सरकार समाजाची जाणूनबुजून दिशाभूल करतंय, असे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here