संगमनेर नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक शौचालयांसाठी ₹1.50 कोटींचा निधी मंजूर

0
166

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत मंजुरी

संगमनेर शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (शहरी) 2.0 अंतर्गत सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामासाठी सुमारे ₹1 कोटी 50 लाख निधीस मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात शासनाकडून आदेश (GR)ही जारी करण्यात आला असून आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

आमदार तांबे यांनी दि. 02 फेब्रुवारी रोजी संगमनेर नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामांसाठी स्वच्छ भारत मिशन (शहरी) 2.0 अंतर्गत निधीची मागणी केली होती. संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी देखील संगमनेर नगरपरिषदे मार्फत शहरातील 6 महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्याचा प्रस्ताव स्वच्छ भारत मिशन (शहरी) 2.0 अंतर्गत सादर केला.

याच पार्श्वभूमीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत मा. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत या आराखड्यास मान्यता देण्यात आली असून शासनाकडून त्यासंबंधी आदेशही जारी करण्यात आले आहेत. शहरातील शौचालयांच्या सुविधेसाठी अंदाजे तब्बल ₹1.50 कोटी निधी मंजूर करण्यात असून केंद्र व राज्य शासनाच्या हिस्स्यातील निधीचा पहिला हप्ता म्हणून 40 टक्के निधी वितरित करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here