पुणे-नाशिक रेल्वेमार्ग देवठाण मार्गेच व्हावा – पालकमंत्री

0
3

रेल्वेमार्ग मूळ सर्वेनुसारच व्हावा : पालकमंत्री विखे पाटील यांची ठाम भूमिका

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – पुणे-नाशिक रेल्वेमार्गाबाबत 2019 साली जाहीर झालेल्या संगमनेर-चिखली-अकोले- देवठाण या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या सर्वेनंतर त्यात झालेल्या बदलांबाबत राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. हा रेल्वेमार्ग मूळ सर्वेनुसारच व्हावा यासाठी आपण केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे ठाम आग्रह धरणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (दि.19) सायंकाळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी आमदार अमोल खताळ, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ना. विखे पाटील पुढे म्हणाले, 2019 मध्ये संगमनेर- चिखली-अकोले-देवठाण असा रेल्वेमार्गाचा प्राथमिक सर्वे करण्यात आला होता. त्यावेळी महारेलचे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी होते. सर्वे पूर्ण झाल्यानंतर 2021 मध्ये मार्गात बदल झाल्याचे समोर आले; मात्र हा बदल नेमका कोणी आणि कोणत्या कारणास्तव केला, याबाबत स्पष्ट माहिती नाही. मूळ आराखड्यानुसार कामाला सुरुवात होण्याची तयारी झाली होती. प्रकल्पासाठी लागणार्‍या भू-संपादनापैकी 50 टक्के हिस्सा राज्य सरकार महामंडळ स्थापन करून त्यावर कार्यकारी उचलणार, असे ठरले होते. यासाठी स्वतंत्र संचालकांची नियुक्तीही करण्यात आली होती.

त्यामुळे प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती, परंतु, रेल्वेमंत्र्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथील जीएमआरटी संदर्भातील काही अडचणींचा मुद्दा उपस्थित केला होता. आता रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण प्रस्ताव तपासून पाहण्यास सांगितले आहे. सर्व नकाशे आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी मी स्वतः बैठक घेणार आहे. या आठवड्यात अधिवेशन सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर रेल्वे अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे. जे सगळे नकाशे आपण ठोस भूमिका घेऊ. मात्र रेल्वेमार्ग आणि कागदपत्रे आहेत, ती तपासा, त्यानंतर मूळ सर्वेनुसारच व्हावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here