कुंथूनाथ सोसायटीत बिबट्याच्या बछड्याचा संचार

0
10

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील नाशिक रोडजवळील कुंथुनाथ सोसायटी परिसरात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बछड्यांची हालचाल सोसायटी परिसरातील घरांमध्ये बिनधास्तपणे फिरताना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.
बछडे आढळल्याने मादी बिबट्या देखील परिसरात असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून खबरदारीचा उपाय म्हणून संगमनेर नगरपालिका व महाराष्ट्र वन विभाग यांच्या अधिकार्‍यांनी परिसरात भोंगा फिरवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शहराच्या आजूबाजूच्या भागात यापूर्वीही अनेकदा बिबट्यांचा मुक्त संचार आढळून आला आहे. गुंजाळवाडी, घुलेवाडी, सुकेवाडी, सामनातून तसेच उसाच्या पट्ट्यात बिबट्यांनी ठाण मांडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही वेळा बिबट्यांकडून नागरिकांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या असून यात काहींचा बळीही गेला आहे.
तसेच बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांची शिकार होत असल्याने शेतकर्‍यांचे पशुधन धोक्यात आले आहे. आता हे बिबटे थेट शहरात आणि मानवी वस्तीत शिरकाव करू लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, नागरिकांनी रात्री उशिरा बाहेर न पडणे, लहान मुलांवर लक्ष ठेवणे, पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवणे आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here