दुधगंगा पतसंस्थेत तब्बल 80 कोटींचा घोटाळा

21 जणांवर गुन्हा दाखल, चौघांना अटक

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर-
संगमनेरातील सहकारातील आघाडीची पतसंस्था असलेली व गेल्या काही दिवसांपासून घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या दुधगंगा पतसंस्थेतील घोटाळ्या प्रकरणी पतसंस्थेचे चेअरमन, मॅनेजर यांच्यासह सुमारे 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पतसंस्थेत चेअरमन भाऊसाहेब कुटे व मॅनेजर भाऊसाहेब गुंजाळ यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मिळून 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपये आपल्या घशात घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दि. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 दरम्यान कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी लेखा परीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी जिल्हापरिषद सदस्य व संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे (रा.गणपती मळा सुकेवाडी), मॅनेजर भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ (रा. संगमनेर), भाऊसाहेब संतु गायकवाड (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), चेतन नागराज बाबा कपाटे (रा. पैठणरोड, संभाजीनगर, औरंगाबाद), दादासाहेब भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), अमोल भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), विमल भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), शकुंतला भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), सोनाली दादासाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), कृष्णराव श्रीपतराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), प्रमिला कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता.राहुरी), अजित कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), संदिप दगडु जरे (रा. भूतकरवाडी सावेडी, ता. नगर), लहानु गणपत कुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), उत्तम शंकर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर), उल्हास रावसाहेब थोरात रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), सोमनाथ कारभारी सातपुते (रा. पावबाकी, ता. संगमनेर), अरुण के बुरड (रा. नयनतारा सिडको कॉलनी, नाशिक), अमोल क्षीरसागर (रा. गंगापूर रोड, नाशिक) अशा 21 जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, संस्थेचे लेखापाल राजेंद्र निकम त्यांच्याकडे दि. 1 एप्रिल 2016 सालापासून दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे फेरलेखापरीक्षण करण्याची जबाबदारी शासनाने टाकली होती. संस्थेचे चेअरमन व मॅनेजर यांनी या संस्थेत मोठा आर्थिक घोटाळा केल्याचे त्यांचे लक्षात आले. ठेवीदाराने केलेली पावतीची मुदत संपून देखील ती रक्कम ठेवीदारांना न देता बोगस सही करून रकमा काढण्यात आल्या आहेत. ही रक्कम चेअरमन भाऊसाहेब कुटे, मॅनेजर भाऊसाहेब गुंजाळ, अकाऊंटट भाऊसाहेब गायकवाड यांनी 3 लाख 96 हजार 425 इतकी रक्कम अपहार केली. बोगस मुदत ठेव युनियन बँक ऑफ इंडिया खाते निर्माण करून केलेला अपहार 19 कोटी 26 लाख 90 हजार 368 रुपये इतका तर व्याज नावे करून केलेला रकमेचा अपहार 2 कोटी 72 लाख 21 हजार 968 रुपये इतका संस्थेचे चेरअमन भाऊसाहेब कुटे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करत केला. दरम्यान संचालक मंडळाचा विरोध असताना कदम कुटुंबातील सदस्यांना 18 कोटी 30 लाख 42 हजार 901 रुपये दिले. यामध्ये देखील अपहार झाला. संस्थेचे चेअरमन यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कायद्याच्या चौकटीत बसत नसताना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले. कॅश क्रेडीट व फिक्स लोन कर्ज वितरित केले हा अपहार तब्बल 12 कोटी 4 लाख 28 हजार 866 इतका आहे. व्यक्तीगत शुभेच्छा जहिराती वर्तमान पत्रात प्रसिद्ध केल्या ते देखील 6 लाख 90 हजार 719 इतका आहे. चेतन कपाटे यांनी संस्थेचे विविध बँकेतील बचत व करंट खात्यावरून चेक व आरटीजीएसद्वारे रकमा वर्ग केल्या आहेत. हा अपहार 2 कोटी 85 लाख 6 हजार 225 इतका आहे. बँक ओहरड्राफ कर्ज घेतलेला अपहार 19 कोटी 60 लाख 82 हजार 79 इतका आहे. संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे यांनी संस्था आपल्या मालकीची असल्यासारखे वागले.

slh


पान 1 वरून – त्यांनी वैयक्तीक खर्च महसुली खर्चात धरत 81 लाख 18 हजार 652 रुपये इतका केला. असा एक तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार या संस्थेत 21 आरोपींनी मिळून केला.दरम्यान, दुधगंगा संस्थेचे चेअरमन हे राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. ते जिल्ह्यापरिषद सद्स्य देखील होते. आ. थोरात यांचे ते विश्‍वासु कार्यकर्ते होते. आ. थोरात यांच्या अधिपत्याखाली अनेक सहकारी संस्था उत्तम काम करत असताना दुधगंगा पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्यामुळे संगमनेरचा सहकार बदनाम होत आहे. या संस्थेचत शेतकरी, मजुर, कामगार, छोटे मोठे व्यापारी यांचे करोडो रुपये अडकून पडले आहे. खात्यावर लाख, कोटी रुपये असताना संस्थेकडून दहा हजार रुपये सुद्धा मिळत नाही. अनेक दिवसांपासून ठेवीदारांना हजार, दोन हजार रुपये रोज या प्रमाणे संस्था वाटप करीत आहे. या किरकोळ पैशांसाठी ठेवीदारांना कामधाम सोडून या संस्थेसमोर ताटकळत बसावे लागत आहे. आपल्या घामाचे पैसे मोठ्या आशेने येथे ठेवले होते. परंतु कुपनानेच शेत खाऊन टाकले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संस्थेत घोटाळे, अपहार, फसवणुक झाल्यानंतर सभासद, ठेवीदार यांच्या पायाखालची वाळु सरकली. अनेक ठेवीदारांच्या मुलांचे लग्न, शिक्षण, आजारपण किंवा महत्त्वाचे कामे खोळंबली आहेत. दुधगंगा पतसंस्थेत झालेल्या या घोटाळ्या प्रकरणी पतसंस्थेचे चेअरमन, मॅनेजर व त्यांच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई करून, त्यांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करावे. अशी मागणी सभासद, ठेवीदार करत आहेत.

दुध गंगा सहकारी पतसंस्थेतील अपहर प्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र फकिरा निकम यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलिसांनी वरील 21 व्यक्तींविरुद्ध 740/2023 भारतीय दंड संहिता 420, 408, 409, 465, 467, 471, 477 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते, अमोल क्षीरसागर यांना पोलिसांनी रात्री अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार झाले आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना लवकरच अटक करू असे आश्‍वासन तपासी अधिकारी शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख