चिंचोली गुरवच्या तरूणाचा दगडाने ठेचून खून

घातपात करून मृतदेह वाळलेल्या फांद्या टाकून ठेवला झाकून

युवावार्ता (प्रतिनिधी)
तळेगाव दिघे –
सिन्नर- संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असणार्‍या कहांडळवाडी शिवारात संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून बेपत्ता असलेल्या एका 36 वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
दिलीप भाऊसाहेब सोनवणे (वय 36) असे मयताचे नाव आहे. बुधवार दि. 3 एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. मयत इसमाचा घातपात करून मृतदेह वाळलेल्या फांद्या टाकून झाकून ठेवलेला होता. मात्र दुर्गंधी सुटल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बुधवारी सकाळी गावातील व्यक्ती या परिसरात आला असता त्याला दुर्गंधी येऊ लागली. त्याने पाहणी केली असता नजीकच लिंबाच्या झाडाच्या फांद्यांच्या खाली दाबलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. त्यानंतर कुजलेला मृतदेह आढळून आल्याची चर्चा परिसरात वार्‍यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ दारूच्या बाटल्या तसेच मयतासोबत झटापट झाल्याच्या खुना पोलिसांना आढळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलवला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत दिलीप सोनवणे हा गावातील कृष्णा जाधव तसेच त्याचा मित्र अजय शिरसाठ याच्या सोबत खत भरण्यासाठी जातो म्हणून बाहेर गेला होता. 31 मार्च पासून तो बेपत्ता होता. 3-4 दिवस तो घरी न आल्याने याबाबत बुधवारी तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची खबर देण्यात आली होती. तर गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने चिंचोली गुरव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर प्रकार घातपाताचा असल्याचा संशय पोलिसांना असून सदर इसमाचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख