विविध आजार व त्यावरील उपलब्ध लस यांची उत्तम माहिती डाॅ. अमेय देशमुख यांनी या लेखाद्वारे शब्दांकीत केली आहे.
नोबेल पुरस्कार विजेते व जागतिक लोकप्रिय व्यक्तीमत्व नेल्सन मंडेला यांनी म्हटले होते की “एखाद्या बाळाचे जगणे किवा मरणे या गोष्टी, त्या देशामध्ये चांगल्या लसी उपलब्ध आहेत किंवा नाहीत या वर अवलंबून असते”. लहान मुलांचे लसीकरण आपल्या सगळ्यांना माहितच आहे. आपण सगळे आपल्या मुलांना जन्मापासूनच राष्ट्रीय लसीकरण एक मोहिमच्या (NATIONAL IMMUNIZATION PROGRAM) अंतर्गत सगळ्या प्रकारच्या लसी नियमीत वेळापत्रकानुसार देत आहोत. या कार्यक्रमामुळे लहान मुलांमध्ये होणारे गंभीर आजार बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत. २०१९ ला आलेल्या कोविड महामारीने आपल्या सगळ्यांना दाखवून दिले कि लसीकरण (VACCINATION) फक्त लहान मुलांसाठी नसून मोठ्या माणसांसाठीही हे तितकेच महत्वाचे आहे. प्रौढांचे लसीकरण (ADULT VACCINATION) हे विकसीत देशांमध्ये राष्ट्रीय पातळीवर राबवले जाते. आपल्या सारख्या देशात जिथे लोकसंख्या खूप आहे , संसर्गजन्य रोग जास्त आहेत, दमा ,रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे आजार व इतर आजार असलेले असंख्य रुग्ण आहेत, त्यामुळे आपल्या देशात प्रौढ्यांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. ६० वर्षावरील सर्वांनी व विशेषतः ज्यांना दमा, रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे आजार किंवा इतर दुसरे आजार आहेत त्यांनी सर्वांनी लसीकरण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे त्यांचे गंभीर आजार व पर्यायाने रुग्णालयात भरती होण्याचा त्रास टाळता येतो.
अस्थमा, बिडी -सिगरेट – तंबाखूच्या धुरामुळे होणारा दमा, अॅलर्जीच्या व श्वसनविकार असलेल्या रूग्णांना influenza व Pneumococcal लसीकरणाचा खूप फायदा होतो. त्यांना फुफ्फुसाचे गंभीर आजार व न्यूमोनिया टाळता येतात. लिव्हरचे आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये तसेच वारंवार रक्ताशी संपर्क येणारे व्यक्ती (जसे डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅब, रक्तपेढी मध्ये काम करणाऱ्या व्यक्ती) यांना पांढऱ्या काविळी पासून वाचवण्यासाठी Hepatitis B हे व्हॅक्सीन अत्यंत प्रभावकारक आहे. खाद्यपदार्थांची हाताळणी व प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांच्यामार्फत टायफॉइडचे संक्रमण होऊ नये म्हणून Typhoid ची लस देणे अत्यंत आवश्यक आहे.
गर्भवती महिलांचे, वयोगट ९ ते ४५ मधील मुली आणि स्त्रियांचे लसीकरण (VACCINATION) ही काळाची गरज आहे व त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा HPV लसीकरणामुळे टाळता येतो. तसेच गरोदर महिलांमध्ये DPT लसीकरणामुळे डीफथेरीया, टीट्यानस, न्युमोनिया इत्यादी गंभीर आजार टाळता येतात. प्रौढांचे लसीकरण हे आजच्या काळाची गरज आहे. आपल्या देशात सध्या ६० ते ८० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरीकांची संख्या भरपूर आहे व त्यापैकी बरेच लोकांना कुठल्या ना कुठल्या आजाराचा सामना करावा लागत आहे. या सर्वांचे लसीकरण होणे गरजेचे आहे लसीकरणामुळे या ज्येष्ठ नागरीकामध्ये आरोग्य उत्तम ठेवण्यास व पर्यायाने त्यांचे आयुष्यमान वाढविण्यास मदत होईल. ज्या प्रमाणे आपल्या घरातील लहान मुलांच्या लसीकरणाकडे (VACCINATION) आपण लक्ष देतो व त्यांचे लसीकरण करून घेतो त्याचप्रमाणे आपण आपल्या घरातील वयोवृद्ध व ज्येष्ठ लोकांचे लसीकरण करून घ्या व त्यांना पुढील आयुष्य निरोगी जगु द्या, अशी विनंती लेखाद्वारे करीत आहोत.
24 ते 30 एप्रिल हा “जागतिक लसीकरण सप्ताह” म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने “देशमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल”, संगमनेर मार्फत सर्व गरजू रुग्णांना Influenza , Pneumococcal vaccine, DPT, Tetanus, HPV, Hepatitis B, Typhoid vaccine या लसी अत्यल्प दरात दिल्या जातील अशी माहिती डॉ अमेय अनिल देशमुख यांनी दिली.