Saturday, October 5, 2024

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

घटनेमुळे निमगाव टेंभी परिसरात शोककळा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे वर्पे वस्तीवर कपडे धुत असताना एका महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या 42 वर्षीय महिलेच्या मानेवर व डोक्यावर दात घुसल्याने ही महिला जागीच ठार झाली. ही धक्कादायक घटना आज बुधवार दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. संगीता शिवाजी वर्पे(रा. निमगाव टेंभी, ता. संगमनेर) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे निमगाव टेंभी परिसरात शोककळा पसरली आहे.

याच परिसरात काही दिवसापूर्वी एका विद्यार्थीनीवर बिबट्याने हल्ला केला होता. तर एक महिन्यापुर्वी दिड वर्षाच्या चिमुरडीच्या गळ्याचा रक्ताचा घोट घेतला होता आज पुन्हा ही घटना घडल्याने संपूर्ण परिसर बिबट्यांच्या भितीने हादरून गेले आहे.
मयत संगिता वर्पे ही महिला कपडे धुण्यासाठी घराच्या समोर असलेले नळावर गेल्या होत्या. तेथे आजूबाजूला शेती, झाडे झुडपे, मका व गिनीगवताची शेती आहे. तेथेच हा बिबट्या दबा धरून बसला होता. संगीता या कपडे धुण्यात व्यस्त होत्या. सदर बिबट्या गिनी गवतातून आला आणि संगीतावर झडप मारत पाठीमागून हल्ला करत तिच्या डोक्याला धरून ओढीत गिनीं गवतात नेले. हा प्रकार वस्तीवरील माणसांनी पाहताच माणसांनी आरडा ओरड केली. गिनीं गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने आतमध्ये जाण्याची कोणाची हिंमत होईना, गवतातून बिबट्याचा व महिलेचा आवाज येत होता. त्यानंतर एका माणसाने ट्रॅक्टर घेतला व आवाजाच्या दिशेने गवतात नेला. त्यानंतर बिबट्यापासुन या महिलेची सुटका केली. मात्र, तोपर्यंत या महिलेने जीव गमावला होता. तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तीला मयत घोषीत केले.

खरंतर, निमगाव टेंभी, देवगाव, हिवरगाव पावसा, रायते, पिंपरणे, जाखुरी, वाघापूर या भागात दिवसा देखील बिबटे वावरताना दिसत आहे. त्यामुळे, वनविभागाने येथे जनजागृती करुन पिंजरा बसविण्याची गरज आहे.
तालुक्यातील बिबट्यांचे प्रमाण वाढले असून हे बिबटे मानवी वस्तीत घुसून थेट नागरीकांवर हल्ले करत असल्याने व त्यात नागरीकांचा बळी जात असल्याने मोठी दहशत पसरली आहे. बिबट्याला मारणे गुन्हा असला तरी माणसे मरत असल्याने आता तरी शासनाने याबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख