भाजपच्या पंटरांना ठाकरेंच्या शिवसेनेत अजूनही स्थान का?

पक्षविरोधी काम करणाऱ्यांचे पितळ उघड पाडणारच : शेख

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
शिर्डी लोकसभा निवडणुकीत शिंदे गट, बीजेपीविरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशा अतिशय अटीतटीच्या लढाईच्या वेळी पक्षातील काही गद्दारांनी दुटप्पी भूमिका घेत शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात काम केले. स्वतःचे खिसे कसे गरम राहतील या एकाच विचारधारेने एकत्र आलेल्या मंडळींना मुद्दाम एकत्र का आणले गेले? ही मंडळी निवडणुकीत संशयास्पदरित्या का वागली? शिवसेनेत नावापूरते राहून हे लोक ठाकरेंवर आणि महाविकास आघाडीवर सतत टीका करणार्‍या भाजपच्या मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित कसे? भाजपच्या संगमनेर येथील जल्लोष कार्यक्रमात देखील यांची थेट उपस्थिती कश्यामुळे? तसेच भाजपच्या पदाधिकारी निवड कार्यक्रम सत्कार कार्यक्रमात देखील हे गद्दार लोक उपस्थित कसे राहतात? पक्षाचे वरिष्ठ पुरावे बघून देखील कार्यवाही का करत नाही? आधी देखील पक्षासोबत गद्दारी करणार्‍या दुतोंडी लोकांच्या तक्रारी सेनाभवन दिल्या आहेत. मात्र निवडणुकीची वेळ जाऊ देण्याचा सल्ला वरिष्ठांनी दिला होता.

आता मात्र निवडणुकीत दिलेली जबाबदारी पार पाडून आणि भाजपा, शिंदे गटाचा पराभव करत शिवसैनिकांनी आपला उमेदवार विजयी करुन दाखवला असल्याने संघटनेत पुन्हा उत्साहाचे वातावरण तयार झालेले असतांना भाजप नेत्यांच्या तालावर नाचणारे गद्दार भाजप समर्थकांना तत्काळ पक्षातून काढून जिल्हा शिवसेनेची पुनर्बांधणी व्हावी याकरीता जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख व प्रमुख नेते यांना भेटून पुराव्यांनीशी तक्रार करणार व शिवसेनेत राहून भाजपशी सालगी ठेवणार्‍या गद्दारांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावे अशी मागणी वाहतूक सेना शहरप्रमुख तथा माजी उपशहर प्रमुख इम्तियाज शेख यांनी केली आहे.


याबाबत निवेदनात शेख यांनी म्हटले आहे की, सतत शिवसेना पक्षविरोधी कारवाई करणार्‍या गद्दारांची हकालपट्टी कधी होईल? हा प्रश्‍न निष्ठावंत उपस्थित करीत आहेत. लोकसभा निवडणूक दरम्यान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पाडण्यासाठी बीजेपी व शिंदे गटाने खुप प्रयत्न केले. त्यातच शिवसेनेतील काही गद्दार देखील त्यांना आतुन मदत करत होते. परंतु निष्ठावंत शिवसैनिक कोंग्रेस व राष्ट्रवादीचे प्रमाणिक कार्यकर्ते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले. परंतु आता येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून पक्षातील गद्दारांची त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी निष्ठावंत शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान विजयानंतरही शिवसेनेत असलेली खदखद व अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याने आगमी विधानसभा निवडणूकीत हा वाद आणखी पेटणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख