व्हिजन कोचिंग इन्स्टिट्युटचा तिसरा वर्धापण दिन दिमाखात साजरा
संगमनेर- बदलत्या जगात चांगले करियर करण्यासाठी चांगला मार्ग व चांगली संस्था निवडणे एक आव्हान आहे.ग्रामीण भागातल्या तरुणांची उच्च स्वप्ने पूर्ण करण्याचा मार्ग मुंबई,पुना, लातूर व कोट्यातूनच जातो.असा पालकांचा समज होता. तो डॉ.नामदेव गुंजाळ यांनी खोडून काढला. व्हिजन कोचिंग इन्स्टिट्युट उभी करून ही संधी उपलब्ध करून दिली व करियर करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय निर्माण केला. असे उदगार एकविरा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांनी काढले.
त्या पुढे म्हणाल्या की, संगमनेर सारख्या सहकाराचा सर्वांगीण विकास साधलेल्या तालुक्यात ए.सी.क्लासरूम, उत्तम लायब्ररी, स्वतःचा अभ्यासक्रम राबवणारी संस्था उभी केल्याबद्दल डॉ.गुंजाळ यांचे अभिनंदन करायला हवे. पालक आता या संस्थेमुळे आपल्या पाल्याच्या करियर बाबत निश्चिन्त झाले आहेत.
त्या व्हिजन कोचिंग इन्स्टिट्युटच्या तिसऱ्या वर्धापण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासापीठावर संस्थापक डॉ.नामदेव गुंजाळ, शिक्षण समितीच्या माजी सभापती विद्याताई गुंजाळ, लोणावळा येथील प्रसिद्ध व्यवसायिक आदित्य पाळेकर सौ.शिल्पा पाळेकर, संचालक डॉ.हर्षवर्धन गुंजाळ, प्रा. राहुल मिश्रा इ.उपस्थित होते.
डॉ.गुंजाळ म्हणाले की, माझ्या मुलाला क्लासेस साठी नाशिकला ठेवायची वेळ आली तेव्हा ही पालकांची समस्या माझ्या लक्षात आली. आपल्या शहरात व जवळपास असा क्लास असू नये याचे वाईट वाटले. मग पालकांची ही समस्या सोडवण्यासाठी मी व्हिजन कोचिंग इन्स्टिट्युटची निर्मिती केली. ती दर्जेदार असावी म्हणून कोटा येथील नामांकित क्लासच्या शिक्षकांची नेमणूक केली. गेल्या तीन वर्ष्यात CET,JEE , TALENT SERCH मध्ये सर्व विध्यार्थ्यांचे रिझल्ट अत्यंत उत्तम लागल्याने त्यांच्या कौतुकासाठी हा कार्यक्रम घ्यावा लागला.
आदित्य पाळेकर व प्रा. राहुल मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विध्यार्थ्यांनी करियर विषयक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सर्व गुणवंत यशस्वी विध्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ.हर्षवर्धन गुंजाळ यांनी आभार मानले. व्यवस्थापक दीपक पावसे व प्रा. डॉ. ऐश्वर्या साळवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला विध्यार्थी, पालक व व्हिजनचा सर्व स्टाफ मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.