व्यावसायिकास धक्काबुक्की करून तोडफोड

12 जणांवर गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर बेकायदेशिर जमाव करुन व्यावसायिकास धक्काबुक्की, शिविगाळ, दमदाटी करुन तसेच दगडफेक करुन त्याच्या शेडचे नुकसान केले. ही घटना शहरातील मालदाड रोड येथील दत्तनगर परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील दत्तनगर येथे जमावाने दशरथ बबन सातपुते यांना शिवीगाळ करून धमकी देऊन शेडवर दगडफेक केली. यामुळे सातपुते यांच्या शेडचे मोठे नुकसान झाले. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात धिरज सोमनाथ ढगे (वेल्हाळे रोड), राजु यादव खरात (रा. लक्ष्मीनगर), रविंद्र अरुण गिरी (रा. घुलेवाडी), सुनिल जाधव (रा. वेल्हाळे), साईनाथ शिंदे (शिवाजीनगर संगमनेर), संतोष घेगडमल (रा. कासारवाडी), प्रविण देवेंद्र गायकवाड (रा. समनापुर), विजय खरात (रा. घुलेवाडी), दिपक बाळु सातपुते (मालदाड रोड), रुपाली धिरज ढगे, जयाताई डोळस (रा. चैतन्यनगर), मेश्राम या बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार लोखंडे करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख