संगमनेर बाजार समितीवर काँग्रेस नेते आ.थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व

बाजार समिती

भाजप प्रणित विखे गट भुईसपाट

18 पैकी 18 जागा मोठ्या मताधिक्याने विजय: विखेंना भोपळा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
राज्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या संगमनेर बाजार समितीत माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. तर पहिल्यांदाच विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा विकास पॅनलने या निवडणूकीत थोरातांच्या शेतकरी विकास मंडळाला जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र तालुक्यातील शेतकरी व बाजार समिती सभासदांनी आ. थोरात यांच्यावरच विश्‍वास दाखवत एकहाती सत्ता बहाल केली. तर जनसेवा विकास मंडळाला मोठ्या प्रयत्नानंतरही खातेसुद्धा उघडता आले नाही. जनसेवेच्या सर्व उमेदवारांनी आपल्या डिपॉजीट जप्त करून घेतले. 18 जागांपैकी त्यांच्याच गटाचा अपक्ष वगळता सर्व जागांवर विजय मिळविला.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी काल शुक्रवार तब्बल 97 टक्के मतदान झाले होते. आज शनिवारी शहरातील जनता नगर येथील जिजामाता प्राथमिक शाळेत मोठ्या बंदोबस्तात सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आ. बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेल्या या बाजार समिती निवडणुकीत आजी माजी महसूल मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष सकाळपासून या निकालाकडे लागले होते.


सोसायटी मतदारसंघातून विद्यमान सभापती शंकरराव हनुमंता खेमनर (1130), कान्हेरे सुरेश रामचंद्र (1150), खताळ सतीश विश्‍वनाथ (1140), गायकवाड गीताराम दशरथ (1129), गोपाळे मनीष सूर्यभान (1116), पानसरे कैलास बाळासाहेब (1094) सातपुते विजय विठ्ठल (1049)हे निवडून आले आहे तर महिला राखीव मतदार संघातून सौ. वर्पे दिपाली भाऊसाहेब(1181) व सौ साकोरे रुक्मिणी शिवाजी (1166) या विजयी झाल्या आहेत. इतर मागासवर्गीय मतदार संघातून -ताजणेे सुधाकर पुंजाजी(1176) तर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून- घुगे अनिल शिवाजी (1079) हे विजयी झाले आहेत. व्यापारी मतदारसंघातून भंडारी मनसुख शंकर (336) व शेख निसार गुलाब (339) हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत तर ग्रामपंचायत मतदार संघातून- वाघ अरुण तुळशीराम(841), शरमाळे सखाहारी बबन(834), खरात संजय दादा (930), कडलग निलेश बबन (936) हे विजयी झाले आहेत. मैत्रीपूर्ण लढत झालेल्या हमाल मापाडी मतदारसंघातून कर्पेे सचिन बाळकृष्ण (90)हे विजयी झाले आहेत.


राज्याचे माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकासात पुढे असून सर्व सहकारी संस्था या देशासाठी आदर्शवत ठरल्या आहेत. संगमनेरच्या सहकार पॅटर्न हा राज्याला मार्गदर्शक असून आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील मोठी व शेतकर्‍यांसाठी सुख सुविधा देणारी अद्यावत बाजार समिती म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीवर कांग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे एक हाती यांची वर्चस्व राहिले असून गेली अनेक वर्ष या बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध होत होत्या.मात्र यावर्षी झालेल्या निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत नेतृत्वावर सार्थ विश्‍वास ठेवत शेतकरी विकास मंडळाच्या 18 पैकी 18 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करत विरोधी पॅनल चा धुव्वा उडवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आजी-माजी महसूल मंत्र्यांमध्ये एकमेकांच्या मतदार संघातील हस्तक्षेपावरून व राजकीय कुरघोडीवरून संघर्ष पहायला मिळत आहे. त्यातच अनेक वर्षानंतर झालेल्या बाजार समितीच्या निवडणूकीत शेतकरी विकास मंडळासमोर जनसेवा पॅनलने आव्हान उभे केले होते. जनसेवा पॅनलच्यावतीने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप तालुकाध्यक्ष सतिश कानवडे, श्रीराम गणपुले, अमोल खताळ, जावेद जहागीरदार, संदिप देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते लढा देत होते. या सर्व विजयी उमेदवारांचा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी मा.आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, बाबा ओहोळ ,मिलिंद कानवडे, विश्‍वासराव मुर्तडक, शिवसेनेचे अमर कतारी व इतर शिवसेनिक यांचेसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या निकालाने मात्र संगमनेर व येथील सहकारावर आ. थोरात यांचाच बोलबाला असल्याचे सिद्ध झाले आहे.

जनतेने खबऱ्यांचा बंदोबस्त केला

राज्यात विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर तालुक्याच्या विकासात अडथळे निर्माण करण्यासाठी काही खबरे काम करत आहेत. मात्र या निवडणुकीत सुज्ञ मतदारांनी खाबर्‍यांचा पूर्ण बंदोबस्त करताना सर्वांना धोबीपछाड दिला असल्याचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी म्हटले आहेत

सचिन कर्पे यांचा शेतकरी विकास मंडळास पाठिंबा

मैत्रीपूर्ण झालेल्या हमाल मापाडी मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते बाळकृष्ण कर्पे व विजयी उमेदवार सचिन बाळकृष्ण कर्पे यांनी विजय होताच नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विजयाच्या घोषणा देत शेतकरी विकास मंडळाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करून यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख