महामार्गावर वन्य प्राण्यांसाठी होणार अंडरपास, ओव्हरपास

वन, वन्यजीव, राष्ट्रीय महामार्ग समितीकडून महामार्गावर पाहणी


सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी या महामार्गासाठी तोडलेल्या वृक्षांसदर्भात तसेच वन्यजीवन संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. त्यात वन्यजीवांना रस्ता ओलंडण्यासाठी अंडरपास, ओव्हरपास निर्माण करण्याची मागणी असल्याने त्याची दखल घेऊन राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने वन, वन्यजीव संस्थांची समिती गठीत केली होती. तसेच या समितीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी मदत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या समितीने ही पाहणी केली आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर (खेड-सिन्नर राष्ट्रीय महामार्ग) वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असलेल्या ‘अंडरपास’, ‘ओव्हरपास’ची पुरेशी सोय करण्यात न आल्यामुळे आतापर्यंत अनेक बिबटे व वन्यजीवांना आपला जीव गमवावा लागला आहे. महामार्गावर जिथे अंडरपास, ओव्हरपासची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी शनिवारी (दि.22) भारतीय वन्यजीव संस्था, वनविभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे पाहणी केली.
खेड-सिन्नर महामार्ग (नाशिक-पुणे) निर्माण करताना केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने विविध अटीसह मुख्य महाव्यवस्थापक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना आदेश दिला होता, त्यातील अनेक अटींची आतापर्यंत पूर्तता झालेली नाही. त्यामुळे महामार्गाच्या निर्मितीनंतर वाहनांच्या धडकेत मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात सर्वाधिक मृत्यू बिबट्यांचा झाला असून त्यांचा अपघाती मृत्यू होणे, ही गंभीर बाब आहे.
महामार्गावर वाहने भरधाव असतात, त्यांच्या धडकेत वन्यप्राण्यांचा नाहक जीव जातो. नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गालगत तसेच परिसरातील गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर आहे. संगमनेर तालुक्यात महामार्गालगत असलेल्या अनेक गावांच्या हद्दीत वाहनांच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. वन्यप्राण्यांसाठी मार्ग निश्‍चित होऊन त्या मार्गाची निर्मिती झाल्यास त्यांचे जीव वाचतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख