छावा क्रांतीवीर सेनेच्या विलीनीकरणाने स्वराज्याची ताकद द्विगुणित

छत्रपती संभाजीराजे

प्रस्थापितांना जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – छत्रपती संभाजीराजे

युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर – रयतेच्या प्रश्‍नावर सतत संघर्ष करणारी छावा क्रांतीवीर सेना स्वराज्यात विलीन झाल्याने संघटनेची ताकद शत पटीने वाढली आहे. त्यामुळे समाजकारण आणि राजकारणात प्रस्थापित होऊन सामान्यांचे शोषण करणार्‍या प्रवृत्तींच्या उरात धडकी नक्कीच भरेल असा विश्‍वास छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज, स्वराज्य संघटनेच्या संस्थेचे संस्थापक छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथे छावा क्रांतीवीर सेनेचा नववा वर्धापन दिन तसेच संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी छावा क्रांती वीर सेना स्वराज्य संघटनेत विलीन केल्याची घोषणा करण गायकर यांनी केली.


यावेळी व्यासपीठावर संपादक अभिजित राणे, शिवाजी सहाणे, करण गायकर, डॉ. धनंजय जाधव, अप्पासाहेब कुडेकर, माधव देवसरकर, सदाशिव माळी, हेमलता कांडेकर, प्रमोद जाधव, सविता गायकर आदीसह छावा क्रांतिवीर सेनेची प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, सामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, महिला या सर्व घटकांच्या मूलभूत गरजा स्वातंत्र्याच्या पंच्चाहत्तर वर्षातही पुर्ण होऊ शकल्या नाहीत. शेतकरी सर्वच बाजूने नाडला जातो, शेती मालाला हमी भाव नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दिशा निश्‍चित करण्यात राजकारणी अपयशी ठरले आहे. कामगार, शेत मजुरांची पिळवणूक सुरु आहे. महिला सबली करणाच्या केवळ गप्पा मारल्या जात आहेत. दुसर्‍या बाजूला महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठाही धोक्यात आहे.

एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या सहकार्याने उभे केलेले स्वराज्य अडचणीत आल्यानेच स्वराज्य संघटना स्थापन करण्याची गरज निर्माण झाली. गाव तिथे स्वराज्य आणि घर तिथे मावळा या उदीष्टाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत करण गायकर यांचा सिंहाचा वाटा आहे. करण गायकर खर्‍या अर्थाने नेतृत्व देऊ शकतील असे नेतृत्व गुण त्यांच्यात आहेत. म्हणूनच त्यांचा सार्थ अभिमान आहे. करण गायकर यांनी महाराष्ट्राच्या कानकोपर्‍यात वाढवलेली छावा क्रांतीवीर सेना स्वराज्य संघटनेत विलीन केली. स्वराज्याची वाढलेली ताकद प्रस्थापितांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही.


अभिजीत राणे म्हणाले, करण गायकर महाराष्ट्रातील पत्रकारांचा सच्चा मित्र आहे. मन मोकळे पणाने पत्रकारांशी हितगुज करून रोख ठोक भूमिका मांडणारे फार कमी कार्यकर्ते समाजकारणात आणि राजकारणात आहेत, त्यात करण गायकर पहिल्या पंक्तीत बसतात. स्वराज्य संघटनेला अशा नेतृत्वाचा नक्कीच फायदा होईल.अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देतांना करण गायकर यांनी स्वराज्य संघटना, छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानून प्रस्थापित राजकारण्यांनी निर्माण केलेल्या शोषित व्यवस्थेवर टिकेची झोड उठवली. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, अशी दिशाभूल करून राजकारण करणार्‍या पुढार्‍यांनी आपली सारी संपत्ती मराठा समाजाच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी दान करून टाकावी, त्यानंतर मराठा समाज आरक्षण मागणार नाही असे सडेतोड भाष्य केले.


हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आशिष कानवडे जिल्हाप्रमुख, रोहित यादव, संजय चौधरी, शांताराम गायकवाड,संदीप राऊत, गणेश थोरात, संदीप वरखडे, भागवत कानवडे, रामनाथ कानवडे, सचिन कानवडे, राहुल कानवडे, गणेश फरगडे, आमिन शेख सागर कानवडे, आदींनी परिश्रम घेतल

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख