संगमनेरच्या व्यापाराला गिळतोय स्मार्ट ट्रेंड? ; स्थानिक व्यापारी धनदांडग्या बाह्यशक्तीमुळे हवालदिल – भाग 1

युवावार्ता (वि. प्रतिनिधी)
संगमनरे – संगमनेरची बाजारपेठ म्हणजे राज्यात लक्षवेधी आर्थिक उलाढाल करणारी बाजारपेठ, प्रवरेच्या काठावर वसलेला संगमनेर तालुका व्यापाराच्या दृष्टीने नेहमीच महत्वाचा तालुका समजला जातो. तालुक्यात शेती, दुध धंदा यासोबतच इतर जोडधंदे असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी सधन आहेत. सण-समारंभ साजरे करतांना संगमनेरची बाजारपेठ फुलून जाते त्याचप्रमाणे व्यापारी बांधवांमध्येही समाधानाचे वातावरण असते. अगदी मंदीच्या काळातही इथला व्यापार थंडावला किंवा थांबला असे कधी झाले नाही.


तालुक्यातील उच्चशिक्षीत नवतरुण मोठ्या शहरांमध्ये जाऊन स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करीत आहे, बहुतांश कुटुंबातील तरुण हे पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये स्थिरावले आहेत. तसेच शहरात असलेली तरुण मंडळी सुद्धा खरेदी करण्यासाठी मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन खरेदी करण्याचा ’ट्रेंड‘ वाढला आहे, तरुणाईची ही ‘स्मार्ट’ चाईस आणि संगमनेरची वाढती बाजारपेठ लक्षात घेता संगमनेर शहरात मोठमोठ्या उद्योग समूहांनी आपले बस्तान बसवायला सुरुवात केली. मोठ्या शहरांमध्ये आहेत पण संगमनेरमध्ये असा एकही व्यवसाय काही अपवाद वगळता दिसत नाहीत त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, हॉटेल व्यवसाय, कापड व्यवसाय, किराणा दुकान हा दैनंदिन गोष्टींचा समावेश आहे.


सुरुवातीला ग्राहकांचा कल ओळखून व सणासुदीचे दिवस पाहून काही दिवसांसाठी येणार्‍या ऑनलाईन खरेदीच्या संकटांचा सामना व्यापारी वर्गाने केली. यामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये स्थानिक व्यापाराचे मोठे नुकसान झाले. याबाबत स्थानिक व्यापार्‍यांनी जनतेेचे प्रबोधन करण्याचे बरेच प्रयत्न केले परंतू स्वस्तात वस्तू मिळतेच म्हणून कोणीही त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, आता त्यातच भर पडली आहे ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योगांची. अगदी ऑनलाईनच्या दरात किंवा त्यापेक्षाही स्वस्त दरात वस्तू घरपोच उपलब्ध करुन देऊ असा दावा हे व्यावसायिक करीत आहे. परंतू हेच खरं आहे असे मुळीच नाही.


या व्यवसायांमध्ये ठिकाणानुसार, ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेनुसार तसेच काही ठराविक ग्राहकांना समोर ठेवून, सुटीचे दिवस पाहून काही कालावधीसाठी ठराविक वस्तूंमध्ये भरमसाठी सुट दिली जाते, परंतू बहुतांश वस्तू ज्यामध्ये ग्राहक लक्ष देत नाहीत त्या वस्तूंच्या किमती मात्र तशाच असतात. जो ग्राहक खरेदीच्या वेळी दक्ष राहून विचार करत नाही त्याचा आपल्याला फार फायदा झाला असा गैरसमज होतो परंतू त्याआडून त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त खरेदी करुन घेतली जाते नव्हे तर ती आपोआपच केली जाते. ग्राहकांचे हे मानसशास्त्र समजण्यासाठी मोठमोठी यंत्रणा राबत असते, शिवाय खरेदी झाल्यावर बिलावरील बचतीची रक्कम पाहून ग्राहकही खूष होऊन जातो. या व्यवसायांमध्ये जी सुट दिली जाते ती शक्यतो जास्तीत जास्त खरेदी केल्यावर किंवा ग्राहकाच्या खर्च करण्याच्या मर्यादेपलीकडे खरेदी केल्यावरच मिळतात. प्रत्येकाच्या खिशात असलेले क्रेडीट कार्ड आणि ऑनलाईन पैसे देण्याच्या सवईमुळे ‘जिओ जी भरके’ नुसार ग्राहकाच्या लक्षात मात्र या गोष्टी येत नाहीत. याबाबत स्थानिक दुकानदारांशी चर्चा केल्यावर त्यांनी अशा व्यवसायाबाबत नाराजी दर्शविली परंतू ग्राहकांना खेचण्यात असे व्यवसाय यशस्वी होत आहेत हेही मान्य केले. त्यांची मोठमोठ्या व्यवसायिकांकडून माल थेट खरेदी करण्याची क्षमता असल्यामुळे आम्हाला ज्या भावात माल खरेदी करावा लागतो त्याहीपेक्षा स्वस्त भावात काही माल ते ग्राहकांना देत असल्याचे धक्कादायक वास्तव त्यांनी कबूल केले.

मोठमोठ्या उद्योजकांसोबत असलेले व्यापारी संबंध व माल खरेदी करण्याची क्षमता ही सामान्य व्यावसायिकांच्या तुलनेने फार मोठी असल्याने असे व्यावसायिक मालाच्या खरेदीवर आकर्षक सुट देत आहेत. शहरातील नागरिकांसाठीही हा अनुभव नवीन असल्याने तिकडे जाण्याचा त्यांचा कल आहे, एकदा आपली बचत होत आहे असा समज झाल्यानंतर अनावश्यक खरेदी केली तरी ती हवीहवीशी वाटत आहे, त्यातून महिनाअखेर खिसा रिकामा झाल्याचा अनुभव अनेकांना येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख