आत्महत्या, अपघात की घातपात? – चर्चेला उधाण

अपघातग्रस्त कार


सिन्नर (किशोर लहामगे)

युवावार्ता (प्रतिनिधी) सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड गावाजवळ एक अपघातग्रस्त कार आढळून आली. या कारचा पूर्ण चक्काचुर झालेला आहे. ही कार महामार्गालगतचा कठडा तोडून लगतच्या विहिरीला धडकली असावी असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. अपघात घडला घोरवडजवळ पण, चालकाचा मृतदेह तेथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल जयभवानी सिन्नर महामार्ग येथे शेडच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे हा अपघात की घातपात की आणखी काही असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


सुरुवातीला कारचालकाचा शर्ट शेजारील डोंगराच्या पायथ्याशी सापडला. अपघात घडला त्या ठिकाणापासून तब्बल चार किलोमीटर अंतरावर शेडच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने कारचालकाने अपघाताचा बनाव रचून आपले जीवन संपविल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, अपघाताचा बनाव करुन अशाप्रकारे आयुष्याचा शेवट करण्याची काय गरज असाही प्रश्‍न पडतो? आकाश मोहन खताळे (वय 24) रा. अंबड चिंचाळे असे या कारचालकाचे नाव आहे. कारचालक हा पांढुर्ली येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता, अशी माहीती मिळत आहे. मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. या अपघाताच्या प्रकाराने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून हा अपघात आहे की काही घातपात की आणखी काही याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख