निकिता कमलाकरने पटकाविले आशियाई युवा वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक

0
1777

भारताच्या निकिता कमलाकरने आशियाई युवा वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी रौप्यपदकाची कमाई केली. ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत निकिताने ५५ किलो वजनी गटात ६८ किलो स्नॅच आणि ९५ किलो क्लीन-जर्क असे एकूण १६३ किलो वजन उचलले. गेल्या महिन्यात मेक्सिको येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत निकिताचे पदक थोडक्यात हुकले होते. परंतु बुधवारी तिने हे यश मिळवल्यानंतर कमलाकर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. तिचे अपंग वडील तेरवाड (ता. शिरोळ) येथे चहाचे फिरते विक्रेते आहेत. तसेच आई खासगी रुग्णालयात नोकरी करते. तिच्या यशाने आई-वडिलांसह आजोबांच्या डोळय़ांत आनंदाश्रू तरळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here