सफायर आयडॉल गायन स्पर्धेचा मंच कलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ – जयश्रीताई थोरात

जयश्रीताई थोरात


लायन्स क्लब संगमनेर सफायर तर्फे ‘ सफायर आयडॉल गायन स्पर्धा ‘ उत्साहात संपन्न

युवावार्ता (प्रतिनिधी)

सफायर आयडॉल गायन स्पर्धेचा मंच म्हणजे संगमनेर शहरातील व पंचक्रोशीतील सर्व गायक कलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे. आज या व्यासपीठावरुन अनेक गायक कलावंत यशस्वी होऊन राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपले नांव झळकवत आहेत, असे प्रतिपादन एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर लायन्स क्लब सफायर चे संस्थापक अध्यक्ष ला. गिरीष मालपाणी, युनिकॉल एडीसिव्ह चे संचालक गिरीष चुग, प्रकल्प प्रमुख संदिपजी चोथवे, सुनिता मालपाणी, डॉ. जितेंद्र पाटील, विद्यमान अध्यक्ष उमेश कासट, सेक्रेटरी कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांनी सदरच्या कार्यक्रमाचे विशेष कौतुक करत हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून ग्रामीण भागातील कलाकरांना या माध्यमातून सुवर्णसंधी प्राप्त करुन देण्याचे मोठे कार्य लायन्स क्लब संगमनेर सफायर करीत आहे. या क्लबचे सामाजिक क्षेत्रातील योगदान अतिशय उल्लेखनीय असून मला या क्लबचा विशेष अभिमान वाटतो असे त्या म्हणाल्या.


लायन्स क्लब सफायर चे संस्थापक अध्यक्ष गिरीष मालपाणी म्हणाले की, लायन्स क्लब संगननेर सफायर नेहमीच संगमनेरकरांसाठी सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक, मनोरंजनपर उपक्रम आयोजित करीत असतो. या क्लबच्या माध्यमातून गुणी कलावंतांना न्याय मिळावा म्हणून गेल्या आठ वर्षापासून सफायर आयडॉल या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे आणि यापुढेही करण्यात येईल असे आश्वासन श्री मालपाणी यांनी दिले.


या प्रसंगी प्रायोजक युनिकॉल एडीसिव्ह या कंपनीचे संचालक श्री. गिरीष चुग बोलताना म्हणाले की, लायन्स क्लब सामाजिक कार्यासोबतच स्थनिक कलावंतांच्या गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. या गायन मंचाचा सुवर्णसंधी म्हणून स्थानिक कलावंतांनी लाभ घ्यावा व गायनक्षेत्रात आपले करीअर करावे असे अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीने दोन दिवस आयोजित सफायर आयडॉल या गायनस्पर्धेमध्ये एकूण १०५ कलावंतांनी आपली कला सादर करत स्पर्धेमध्ये रंगत आणली. प्रथम गटातून आरव कलंत्री, द्वितीय गटातून साईशा दिघे, तृतीय गटातून प्रज्ञा त्रिभुवन, चतुर्थ गटातून दिक्षा वाघ आणि पाचव्या गटातून प्रा.श्रीहरी पिंगळे हे प्रथम विजेते व सफायर आयडॉल ठरले. तसेच सुपर सफायर आयडॉल २०२२ ची ईशा रहाणे ही विजेती ठरली. सदर स्पर्धा अतिशय रंगतदार, बहारदाररित्या संपन्न झाली. सदर परीक्षेचे परीक्षण श्री. सतिष मालवणकर, श्री अनिरुध्द शाळीग्राम, कु. दिव्या मालपाणी, श्री प्रशांत रुणवाल यांनी केले. यावेळी सर्व सफायर आयडॉल व इतर विजेत्यांना स्मृतीचिन्ह, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


दोन दिवस चाललेल्या सफायर आयडॉल या स्पर्धेचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख ला. संदिप चोथवे यांनी केले तर कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील, ला. सुनिता मालपाणी, ला. प्रियंका भंडारी यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील रसिक प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास महेश डंग, देवीदास गोरे, अतुल अभंग, धनंजय धुमाळ, डॉ. अमोल पाठक, सपना डंग, सारिका चोथवे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख