संगमनेर मर्चन्ट्स बँकेच्या अध्यक्षपदी संतोष करवा तर उपाध्यक्षपदी प्रकाश कलंत्री

मर्चन्ट्स बँकेच्या 58 वर्षांच्या इतिहासात प्रथमच संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –

संगमनेरच्या उद्योग विश्‍वाची कामधेनू असलेल्या संगमनेर मर्चन्ट्स बँकेच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. आज बँकेच्या नूतन संचालकांच्या पहिल्याच बैठकीत सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या असून अध्यक्षपदी संतोष करवा यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश कलंत्री यांची निवड झाली आहे. या दोघांच्या निवडीनंतर व्यापारी एकता मंडळाच्यावतीने फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

दिवंगत उद्योगपती ओंकारनाथजी मालपाणी यांच्या दूरदृष्टीतून 1965 साली स्थापन झालेल्या संगमनेर मर्चन्ट्स बँकेच्या 58 वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. अर्थात त्यासाठी विद्यमान सत्ताधारी व्यापारी एकता मंडळाला आपल्या आघाडीच्या शिलेदारांची माघार घडवून आणावी लागली होती. वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडींनी भरलेल्या या निवडणुकीत एकता मंडळाचे प्रमुख, उद्योगपती राजेश मालपाणी यांनी मोठ्या परिश्रमाने बिनविरोधचा विषय पुढे नेवून जुन्या आणि नव्या संचालकांचा ताळमेळ बसवला. व्यापार्‍यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळख असलेल्या मर्चन्ट्सने बिनविरोध निवडणूक करुन सहाकार क्षेत्रात बहुधा पहिल्यांदाच इतिहास घडवलेला असतांना या ऐतिहासिक वर्षाचे पहिले अध्यक्षपद कोण मिळवणार याबाबत संगमनेरात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. त्याचे उत्तर आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीतून मिळाले असून ज्येष्ठ संचालक राजेश मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पहिल्याच बैठकीत अध्यक्षपदी संतोष करवा यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश कलंत्री यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकार्‍यांचे व्यापारी व संगमनेरकरांकडून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख