संगमनेर भूषण, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व उद्योजक गिरीशजी मालपाणी

मालपाणी उद्योग समुहाचे संचालक असलेले श्री.गिरिश मालपाणी म्हणजे एक ऊर्जादायी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा मिश्कील स्वभाव, वागण्या बोलण्यात असलेली सहजता, नम्रता सर्वांवर प्रभाव टाकणारी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे म्हणजे वक्तशीरपणा. ते वेळेला खूप महत्त्व देणारे आहेत. पहिल्या भेटीतच मन जिंकून घेणारे त्यांचे जादुई व्यक्तिमत्त्व असल्याने अफाट जनसंपर्क आणि मोठा मित्र परिवार त्यांना लाभला आहे. भारतात येऊन पारंपारिक व्यवसायात जबाबदारी स्वीकारली. व्यावसायिक कुटुंबातील असल्याने साहजिकच व्यवसायात सहभागी होण्याकडे कल होताच. अनेक वर्षांपासून मालपाणी उद्योग समूह महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तंबाखू व्यवसायात अग्रेसर आहे. या क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर उत्सवया ब्रँड नावाने खाद्यतेलाच्या व्यवसायात प्रवेश केला. आजमितीला250प्रत्यक्ष डीलर्स आहेत आणि घाऊक आणि किरकोळ विक्रेते यांसारखे अप्रत्यक्ष डीलर्स आहेत. त्यामुळे व्यवसायाची साखळी भक्कम आहे. उत्सव तेलाला बाजारपेठेत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. पण कमोडिटी उत्पादनांमध्ये नेहमीच चढ-उतार होत असतात. म्हणून ग्रुपने या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित केले नाही. त्यानंतर कर्नाटकात गिरीशजी यांनी ‘बादशाह खैनी’ नावाच्या तंबाखूच्या आणखी एका प्रकाराचा प्रयोग केला आहे ज्यासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


समूहाने अजून एका ज्या महत्त्वपूर्ण व्यवसायात प्रवेश केला आहे तो म्हणजे बांधकाम व्यवसाय. प्रत्येक व्यवसायात चढ-उतार असतात, म्हणून सध्याच्या व्यवसायातील निधीचा काही भाग वापरून ते नेहमी नवीन मार्ग शोधत असतात. मालपाणी इस्टेटच्या नावाने ग्रुप रिअल इस्टेट व्यवसायात उतरला. या उपक्रमाचे केंद्रस्थान पुणे, नाशिक आणि संगमनेर आहे. पुण्यात प्राईम लोकेशन्समध्ये जमीन मिळाली आणि 5वर्षात गृप सर्वात प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांपैकी एक झाला. ग्रुपच्या साइट्स पुणे, बावधन पाषाण आणि बाणेर आणि पीसीएमसी परिसरात वाकड येथे आहेत. वाकडमध्ये मालपाणी ग्रीन्स आणि पिंपळे सौदागरमध्ये द क्रेस्ट हे दोन्ही प्रकल्प विकले गेले आहेत. पाषाण येथील एम अजाइल हा प्रकल्प तर या क्षेत्रातील मैलाचा दगड ठरला आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक क्रेडाई सदस्य विशेष सहलीचे आयोजन करून आले होते. पर्यावरण पूरक बांधकाम शैली यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मालपाणी इस्टेटला पुरस्कार देऊनगौरवान्वितकरण्यात आले आहे. एम अजाईल या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला तर मागील तीन वर्षात दहा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे माजी महसूल मंत्री व संगमनेरचे आ. बाळासाहेब थोरात यांनी आवर्जून या प्रकल्पाला भेट देऊन तिची पाहणी केली आणि हा प्रकल्प म्हणजे संगमनेरच्या मालपाणी परिवाराने पुण्यामध्ये केलेला चमत्कार आहे असे गौरवोद्गार काढले.


2005 साली उद्योग समूहाने वॉटर पार्क व्यवसायात पाऊल ठेवले. या उपक्रमामागची प्रेरणा गिरीश मालपाणींच्या कॉलेजच्या दिवसांपासून होती. त्यांनी अभ्यास केला आणि अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान भाऊ श्री मनीष मालपाणी आणि पत्नी सुनिता मालपाणी यांच्यासोबत वेट-एन-वाइल्ड नावाच्या वॉटर पार्कला भेट दिली.1997मध्ये ही एक नवीन संकल्पना होती आणि ती त्यांना खूप आवडली. भारतात परतल्यावर, सगळ्या भावांनी चर्चा केली, सखोल अभ्यास केला, संशोधन केले आणि या प्रकल्पासाठी तयारी केली. शिर्डी हे धार्मिक स्थळ असल्याने दररोज हजारो भाविक भेट देतात हे लक्षात आल्याने शिर्डीत वॉटर पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. श्री साईबाबांच्या दर्शनानंतर तिथे काही विशेष मनोरंजक असे काही नाही असे मालपाणी उद्योग समूहाच्या लक्षात आले. वेट-एन’जॉय वाटर पार्क शिर्डी ला मिळालेले यश हे एक मोठे यश आहे. यामुळे लोणावळ्यात आणखी एक वॉटर पार्क व अम्युझमेंट पार्क सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. त्यासाठी मोक्याची व योग्य जागा शोधण्यास बराच वेळ लागला. शेवटी लोणावळ्याजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेला लागून 70एकर जमीन मिळाली. तेथे आंतरराष्ट्रीय मानकांसह सर्वोत्कृष्ट दर्जेदार भव्य आणि दिमाखदार सर्वात मोठे वॉटर पार्क बनवण्याची योजना आखली. सर्व राईडस् कॅनडा, जर्मनी आणि इटलीच्या आहेत. त्यानंतर पुढच्याच वर्षी वेट एन जॉय लोणावळ्याला लागून असलेले अम्युझमेंट पार्क मॅजिक माउंटन उभारले. 50 पेक्षा जास्त थरारक अनुभव देणार्‍या राईडस् असलेले हे भारतातील सर्वात मोठे मनोरंजन पार्क आहे. यात कुटुंबातील प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे. जागतिक कीर्तीचे श्रध्येय आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर गुरुदेवांच्या शुभहस्ते या पार्कचे शानदार उद्घाटन झाले. आज ते पर्यटकांचे लोकप्रिय स्थळ बनले आहे. त्यानंतर खोपोली येथील देशातील क्रमांक एकचे वाटर पार्क इमजीका अधिग्रहीत केले. हा उद्योग समूहाच्या वाटचालीतील अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. आता इमजीका मध्ये मालपाणी युगाची सुरुवात झाली आहे. त्या पाठोपाठ नुकतेच सुरत येथील अक्वामजीका घेतले. इंदूर येथील पार्कचे कामही प्रगतीपथावर आहे. थोर संत साईबाबांच्या सान्निध्याने पवित्र झालेल्या शिर्डीच्या भूमीत देशातील भव्य आणि अत्याधुनिक ‘साई तीर्थ’ थीम पार्क साकारले. ही संकल्पना अतिशय लोकप्रिय ठरली.


मालपाणी समूहाचा संपूर्ण भारतात पवन उर्जा आणि सौर उर्जा प्रकल्पांमधून आतापर्यंत या व्यावसायिक विभागातून 750 मेगावॅट वीजनिर्मिती होते. या विभागाची व्याप्ती आठ राज्यात आहे. या व्यावसायिक क्षेत्रांव्यतिरिक्त, कँडी, चहा, एफएमसीजी उत्पादने, रिसॉर्ट्स, शिक्षण यांसारख्या क्षेत्रात देखील आहोत.
मागील दोन वर्षांपासून उद्योग समूहाने रिटेल्स च्या क्षेत्रात दमदार पाऊल ठेवले आहे नासिक मध्ये सरगम रिटेल्सची दोन सुपरमार्केट गंगापूर रोड आणि भाभा नगर येथे व नगर जिल्ह्यात कोपरगाव येथे सुरू झाली असून लवकरच पाथर्डी आणि राहुरी येथेही मालपाणी सरगम रिटेल्स सुपर मार्केट सुरू होत आहेत. नासिक मधील दोन्हीही व कोपरगाव मधील सरगम सुपर मार्केटला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. मालपाणी समूहाचा व्यवसाय नैतिकतेने करण्यावर दृढ विश्‍वास आहे. मालपाणी या नावाचा ब्रँड तयार झाला आहे. ज्यावर लक्षावधी लोकांनी विश्‍वास टाकलेला आहे पारदर्शक व्यापार विषयक धोरणामुळे आमच्या सर्व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये मालपाणी समुहाने लोकांमध्ये निर्माण केलेला विश्‍वास हा औद्योगिक विश्‍वामध्ये अभिमानाचा आणि अनुकरणाचा विषय आहे. आज तंबाखू व्यतिरिक्त सोलर अँड विंडमिलने देखील नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षेत्रात वरचे स्थान मिळविले आहे.
मालपाणी ग्रुपच्या यशोगाथेचे रहस्य म्हणजे- राजेश, संजय, मनीष, गिरीश व आशिष हे पाच भाऊ आहेत. दोन वर्षांपासून परिवाराच्या नव्या पिढीतील जय मनीष मालपाणी, यशोवर्धन संजय मालपाणी, हर्षवर्धन राजेश मालपाणी यांच्यावरही संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण एक संघ म्हणून काम करतात. एकमेकांच्या कल्पना ऐकतात आणि साधक-बाधक चर्चा करतात. येथे फायदा असा आहे की प्रत्येक भाऊ संबंधित विभाग पाहतो जसे की, गिरीश मार्केटिंग आणि वॉटर पार्क आणि तंबाखूचा काही भाग पाहतात, दुसरे भाऊ वित्त पाहतात, एक भाऊ बांधकाम बघतात,एक भाऊ खरेदी आणि उत्पादन बघतात त्याचप्रमाणे प्रत्येकाकडे उद्योग समूहातील वेगवेगळ्या विभागांच्या जबाबदार्‍या आहेत. त्यांच्या स्वतःच्या भूमिका आणि जबाबदार्‍या अतिशय स्पष्टपणे परिभाषित केल्या आहेत आणि प्रत्येक महिन्याला एकत्रितपणे पार्टनर्स मीटिंग घेऊन प्रत्येक विभागाचा आढावा घेतला जातो.
गिरीश मालपाणी यांचा युवा वर्गावर प्रचंड मोठा प्रभाव आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये त्यांना व्याख्याने देण्यासाठी विशेष निमंत्रित केले जाते अनेक तरुण-तरुणी गिरीश मालपाणी यांना आपले रोल मॉडेल मानतात. गिरीश मालपाणी यांना त्यांच्या आदर्श बाबत विचारले असता रतन टाटा यांना आपला आदर्श मानतात असे त्यांनी सांगितले. त्याचे कारण कारण टाटा यांचे संपूर्ण औद्योगिक साम्राज्य हे तत्त्वाधिष्ठित आणि मूल्याधिष्ठित पायावर उभे राहिलेले आहे. त्यांच्याकडे मूल्ये आहेत आणि नैतिकतेने सदैव राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करतात.


श्री गिरीश मालपाणी यांना भारतरत्न जेआरडी टाटा यांच्या नावाने समर्पित असलेला उद्योगरत्न पुरस्कार मिळाला आहे. आणि साई रत्न फाउंडेशनचा उद्योग पुरस्कार देखील मिळाला आहे. व्हिजनच्या संदर्भात ते म्हणाले की दरवर्षी 20% वाढ आणि नजीकच्या भविष्यात सर्व क्षेत्रात प्रथम क्रमांकावर पोहोचण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. एकटे आपण थोडेसे करू शकतो; एकत्र आपण खूप काही करू शकतो. यावर गिरीश मालपाणी यांचा भक्कम विश्‍वास आहे 2005 मध्ये लायन्स क्लबमध्ये ज्येष्ठ लायन सदस्य डॉक्टर दिनेशजी वाघोलीकर आणि मित्र श्रीनिवास भंडारी यांच्यामुळे लायन्स क्लब मध्ये प्रवेश केला. लवकरच त्यांनी लायन्स क्लब संगमनेर सफायरची स्थापना केली. समाजसेवेसाठी ते खूप झोकून आणि जिद्दीने काम करायचे आणि अनेक उपक्रम राबवायचे. ज्याद्वारे त्याने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि क्लबमध्ये समाजाच्या विविध स्तरातील अनेक व्यक्तींना सदस्य करून घेतले. संघटन कुशल असलेल्या गिरीशजींनी लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले त्यामुळे त्यांचा जनसंपर्क सतत वाढता राहिला आणि लायन्सच्या विश्‍वामध्ये त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत राहीली. लायन्स क्लबच्या सर्व कार्यक्रमांना ते हजेरीलावून मदत मार्गदर्शन करीत असल्याने अहमदनगर, नाशिक, पुणे येथून अनेक मित्र मिळाले. त्यांच्या व्यापक कार्याची आणि दखल घेऊन त्यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होण्याचा बहुमान मिळाला आणि या संधीचेही त्यांनी सोने करून दाखविले 135 क्लब आणि सुमारे 7000 सदस्यांसह पुणे-अहमदनगर-नाशिक मध्ये त्यांनीलायन्सक्लबच्या माध्यमातून कार्याचा डोंगर उभा केला. या कालावधीतील त्यांच्या कार्यामुळे विविध सामाजिक कल्याणकारी उपक्रमांसह क्लबचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. श्री. गिरीश मालपाणी यांना इंटरनॅशनल लायन्स क्लबने सादर केलेला अ‍ॅम्बेसेडर ऑफ गुडविल देऊन पुरस्कृत करण्यात आले. हा लायन्स क्लबच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे. अतिशय कमी वयात हा पुरस्कार मिळविण्याचा बहुमान त्यांच्या नावावर जमा आहे. पर्यावरण आणि आरोग्य रक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असे त्यांचे ठाम मत आहे. या क्षेत्रातील त्यांच्याच पुढाकाराबद्दल त्यांनी सांगितले की रस्त्यावर थुंकण्याची मोहीम सवय बंद व्हावी यासाठी आतापर्यंत मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील एक लाखाहून अधिक पानपट्टी धारकांना मोफत डस्टबिन पुरविल्या आहेत. तसेच अनेक नामवंत मंदिरे तीर्थक्षेत्रे या ठिकाणी भव्य निर्माण कलश देण्यात आले आहेत नगर जिल्ह्यातील अनेक बस स्थानकांवर मोठ्या आकाराच्या कचरा पेट्या मालवणी उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. गिरीश मालपाणी बोलताना नेहमी इंदूरचे उदाहरण देतात. जे भारतातील सर्वोत्तम स्वच्छ शहर आहे. तिकडे नागरिकांनी आपले शहर नीटनेटके आणि स्वच्छ असावे असा ठाम पवित्रा घेतला आणि त्यानुसार या शहरात बदल दिसून येत आहे. आपले पंतप्रधान मा. मोदीजी प्रत्येक वेळी स्वच्छतेबद्दल मत व्यक्त करतात. हळूहळू गोष्टी बदलत आहेत. ते म्हणतात की मला असे वाटते की 5 ते 10 वर्षांनंतर परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलेल कारण नवीन पिढी अशी आव्हाने स्वीकारत आहे. भारत आणि अमेरिकेच्या शिक्षणपद्धतीत फरक असा आहे की, इथे भारतात प्राथमिक शिक्षणापासूनच टेबल किंवा संबंधित धडे शिकवायला सुरुवात केली जाते, पण अमेरिकेत ते स्वच्छता, आदरातिथ्य इत्यादी शिकवू लागतात. आजकाल भारतीय शाळांमध्येही हे शिकवायला सुरुवात झाली आहे. चांगले आणि जबाबदार नागरिक बनवा. लोक म्हणतात की मी खूप व्यस्त आहे आणि माझ्याकडे वेळ नाही, पण आपण जर श्री गिरीश मालपाणी यांच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला तर ते अनेक व्यावसायिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये व्यस्त असूनही स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही वेळ काढतात. त्यांना संगीताची खूप आवड आहे आणि माऊथ ऑर्गन, सिंथेसायझर वाजवितात. ते एक चांगले गायक देखील आहे. संगीताची आवड आईकडून आली. आजोबा मंदिरात गाणे आणि संगीत वाजवायचे जे पुढच्या पिढीपर्यंत पोचले आहे. संगीत आवडते, कारण संगीत शांतता आणि सुसंवाद देते, तणाव मुक्त करते आणि ते अनेक समस्यांवर औषध आहे. संगीत तुमच्या मित्रासारखे आहे, त्याला कोणत्याही भाषेची, धर्माची गरज नाही. गिरीश मालपाणी नियमित व्यायाम करतात आणि अनेकदा ट्रेकिंगला जातात. ते मालपाणी क्लबच्या माध्यमातून दरवर्षी मालपाणी समर स्पोर्ट कॅम्प आयोजित करतात. ज्यामध्येदेशाच्या विविध भागातून 1000 हून अधिक विद्यार्थी भाग घेतात. टाइम मॅनेजमेंट हा त्यांचा आवडता विषय आहे त्यावर बोलताना ते म्हणतात. नरेंद्र मोदी, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स किंवा कोणत्याही सामान्य माणसाकडे दिवसाचे 24 तास असतात. इतक्या उच्च पदावरची माणसे वेळेचे काटेकोर नियोजन करता तसेच प्रत्येकाने शिकले पाहिजे, एखाद्याने पद्धतशीरपणे दृष्टीकोन ठेवावा, योग्य नियोजन केले पाहिजे, आपण जे काम आज करायचे आहे ते आजच पूर्ण करा, मनाशी जे ठरवले ते ते त्यानुसार करण्याचा प्रयत्न करा. आपोआप यश मिळेल.


संगमनेरमधील अग्रगण्य सहकारी बँक शारदा नागरी पतसंस्थेचेही ते माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक प्रमुख मार्गदर्शक आहेत. शारदा नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांच्या जीवनाला त्यांच्या परिवाराला दिशा मिळाली आहे. अनेक नवउद्योजक शारदाच्या माध्यमातून उभे राहिले आहेत सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य आणि नामवंत पतसंस्था म्हणून शारदा पतसंस्थेकडे गौरवाने बघितले जाते. श्री गिरीशजी मालपाणी यांचे प्रत्येक विषयातील सकारात्मक विचार म्हणजे भारून टाकणारे विचार आहेत. कितीतरी लोक त्यांचे अनुकरण करतात. खरेच श्री मालपाणी हे वर्तमान आणि भावी पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. संगमनेरच्या या कर्तबगार भूमिपुत्राला 50 वर्षांचे समृद्ध अर्धशतकी आयुष्य सफलतापूर्वक आणि समाजाभिमुख पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद आणि भविष्यात गिरीश भाऊंची षष्ट्यब्दीपूर्ती तसेच अमृत महोत्सव एवढेच नव्हे तर शताब्दी गौरव सोहळा साजरे करण्याचे भाग्य ही संगमनेर करांना लाभो हीच परमेश्‍वरचरणी प्रार्थना.
-शब्दांकन
सुदीप हासे (कार्यकारी संपादक)
मुरारी देशपांडे (मालपाणी उद्योग समूह)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख