गुंजाळवाडी चौफुली ते वेल्हाळे रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे काम

खडी ऐवजी वापरले दगड-गाेटे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत गुंजाळवाडी चौफूली ते वेल्हाळे रस्त्याचे काम मंजूर होऊन अनेक दिवस झाले. सदर ठेकेदाराने या रस्त्याचे खडीकरण केले. मात्र अजूनही डांबरीकरण पुर्ण झाले नाही. दरम्यान निकृष्ठ दर्जाचे खडीकरण केल्याने हा रस्ता ठिकठिकाणी उखडू लागला आहे. खडी ऐवजी रस्त्याच्या कामासाठी दगड, गोटे वापरण्यात आले. तसेच रस्ता साप न करता त्यावर डांबर टाकून दगड मिश्रीत खडी टाकण्यात आली. या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे परिसरातील नागरीकांनी या रस्त्याचे काम बंद पाडून संबंधीत ठेकेदाराला जाब विचारला आहे.


केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आता ग्रामपंचायतींना विकासासाठी थेट निधीचे वाटप केले जाते. या निधीतून रस्ते, सार्वजनिक उपकरणाचे अनेक कामे केली जातात. मात्र सदर कामांचा ठेका देतांना टक्केवरी व हितसंबंध जोपसले जात असल्याने अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे कामे होत आहे. दरम्यान गुंजाळवाडी चौफली ते वेल्हाळे हा सुमारे एक ते दिड किलो मीटरचा 12 लाख रूपयांचा रस्ता डांबरीकरणासह मंजूर झाला आहे. या रस्त्याचे चौफुली पर्यंतचे काम ठिकठाक झाले. मात्र पुढे अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे मटेरियल वापरले गेल्याने डांबरीकरणा अगोदरच हा रस्ता उखडू लागला आहे. खडी ऐवजी दगड वापरल्याने हे दगड उघडे पडत आहे. कमी प्रमाणात डांबर वापरण्यात आल्याने व दबावही कमी दिल्याने रस्ता कमकुवत झाला आहे. सुज्ञ नागरीकांना याची माहिती मिळताच त्यांनी याचा जाब विचारत या रस्त्याचे काम बंद पाडले आहे. तीन महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यातच पावसाळा असल्याने हा रस्ता टिकणार का? असा प्रश्नही निर्माण होते. ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर चाळण झाली आहे. तांत्रिक व राजकीय अडचणींमुळे अधीच विकास कामांना निधी मिळत नाही तर निधी मिळाल्यानंतर मात्र संबधीत प्रशासकीय यंत्रणा व ठेकेदार यांच्या मिलीभगतमुळे विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैर प्रकार होतात व कामे निकृष्ठ दर्जाचे होत आहे. तालुक्यात अनेक नव्याने झालेले रस्तेही अल्पावधीतच उखडले गेले आहे. अशा पद्धतीने काम करणार्‍या ठेकेदारांवर व संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी किसान युवा मोर्चाचे अध्यक्ष रविंद्र थोरात, दादापाटील गुंजाळ, सुयोग गुंजाळ, गुंजाळवाडी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख