पोलीसांचा दावा फोल, कत्तलखान्यावर कारवाई

0
1374

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील कत्तलखाने बंद असल्याचे शहर पोलीस सातत्याने सांगत होते. मात्र काही भागात हे कत्तलखाने सुरूच असल्याचे वारंवार दिसून येत होते. अखेर शहरातील मोगलपुरा परिसरातील बेकादेशीर कत्तलखान्यावर काल बुधवारी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कत्तलखान्यामधून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 600 किलो गोमांस जप्त करत शहर पोलीसांचा दावा खोटा ठरवला आहे. काल बुधवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई करत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राज्य सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केल्यानंतर देखील संगमनेर शहर परिसरात कत्तलखाने सुरू राहिले. अनेकदा कारवाई करून, गुन्हे दाखल करून, लाखो रुपयांचे गोमांस नष्ट करून देखील हे कत्तलखाने बंद झाले नाही. डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी कत्तलखाने बंद करण्यासंदर्भात वेळोवेळी पावले उचलली असतानाही शहरातील कत्तलखाने मात्र बंद झालेले नाही.


स्थानिक गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक सचिन अडबल, कॉन्स्टेबल आकाश काळे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव यांच्या पथकाने शहरातील मोगलपुरा परिसरामध्ये छापा टाकला असता या ठिकाणी गोवंशीय जातीच्या जीवंत जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस पथक याठिकाणी गेले असता जनावरांची कत्तल करणारे आरोपी पोलिसांना पाहून पळून गेले. त्यापैकी शफिक महंमद कुरेशी (वय 32, रा. जमजम कॉलनी), शेहबाज गुलफाम कुरेशी (वय 32, रा. मोगलपुरा) यांचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. तर मुजाहित उर्फ मुज्जू दौला कुरेशी, हारुण सुलतान कुरेशी, कलीम जलील कुरेशी, शाहिद इर्शाद कुरेशी, उमर शकुर कुरेशी, खलील बुढण कुरेशी सर्व रा. मोगलपुरा असे पळून गेललेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती या पथकाला मिळाली. पोलिसांनी या ठिकाणाहून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 600 किलो गोमांस, लोखंडी सुरा असा एकूण 1,20,500 रुपये किमतीच मुद्देमाल जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here