निंबाळे येथे पसायदान व्याख्यानमालेचे आयोजन

भूमिपुत्रांचा गुणगौरव व राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार प्रदान सोहळा पडणार पार

संगमनेर
शहरालगत असणाऱ्या निंबाळे येथे श्री दत्त जयंती निमित्ताने चार दिवसीय पसायदान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर यावेळी भूमिपुत्रांचा गुणगौरव व राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. या व्याख्यानमालेचे हे १५ वर्ष आहे अशी माहिती या व्याख्यानमालेचे संयोजक प्रा. निलेश पर्बत व आयोजकांनी दिली.
श्री दत्त जयंती निमित्त सालाबादप्रमाणे निंबाळे येथील दत्त मंदिर, अंकुर नर्सरी येथे रविवार २४ ते बुधवार २७ डिसेंबर सायंकाळी साडेसहा वाजता ही व्याख्यानमाला होत आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प यावर्षी शौर्य पदक प्राप्त सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर हे “२६/११ एक चित्तथरारक कहाणी” या विषयावर गुंफणार आहे.
सोमवार दिनांक २५ रोजी सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव हे “माझा बाप शेतकरी ” या विषयाद्वारे दुसरे पुष्प गुंफणार आहे. तिसरे व्याख्यान मंगळावर २६ रोजी प्रसिद्ध अभिनेत्री पायल जाधव या “संत कान्होपात्रा जीवनपट ( एकपात्री नृत्य प्रयोग) सादर करणार आहे. तर प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख हे पाऊस आणि निसर्ग यावर प्रकाशझोत टाकणार आहे. तर या व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प बुधवार २७ रोजी प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजीत देशमुख हे “जो जे वांछील तो ते लाहो” पसायदान यावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे.
यावेळी ह. भ. प. विष्णू रामचंद्र वैद्य, युवा उद्योजक सागर मधुकर सोनवणे, उत्कृष्ट ऊस उत्पादक विठ्ठल भिकाजी गाडेकर, सह शिक्षिका सौ. संगिता राजकुमार रिकामे, प्रा. डॉ. राजकुमार रिकामे, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब लहानू शेटे, प्रगतशील शेतकरी रूषीकेश बाबासाहेब वाघ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कारभारी देव्हारे यांना सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख